Petrol-Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांनंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. आज, शनिवारी सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात 15 ते 16 पैशांची वाढ केली आहे, तर पेट्रोलच्या किंमती 24 ते 25 पैशांनी वाढल्या आहेत. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलचे दर सर्वोच्च पातळीवर आहेत. आता दिल्लीत पेट्रोलची किंमत 91.17 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 81.47 रुपये झाली आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोलची किंमत 97.57 रुपये तर डिझेलची किंमत प्रति लिटर 88.60 रुपयांवर पोचली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. जर केंद्र सरकारचा उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारचे व्हॅट काढून टाकले गेले तर डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रतिलिटर 27 रुपये असेल. परंतु केंद्र किंवा राज्य सरकार दोघेही हा कर काढून टाकू शकत नाहीत. कारण, यापासून सरकारला मोठे उत्पन्न मिळते.
देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर -
- नवी दिल्ली - 91.17 रुपये प्रतिलिटर
- मुंबई - 97.47 रुपये प्रतिलिटर
- चेन्नई - 93.12 रुपये प्रतिलिटर
- नोएडा - 89.38 रुपये प्रतिलिटर
- कोलकाता - 91.35 रुपये प्रतिलिटर
देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव
- नवी दिल्ली - 81.47 रुपये प्रतिलिटर
- मुंबई - 88.60 रुपये प्रतिलिटर
- चेन्नई - 86.45 रुपये प्रतिलिटर
- नोएडा - 81.91 रुपये प्रतिलिटर
- कोलकाता - 84.35 रुपये प्रतिलिटर
आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किंमती आणि परकीय चलन दरांनुसार दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेल दरात बदल करतात.