Mohan Bhagwat (PC - Twitter)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी एका भाषणादरम्यान म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही पाकिस्तानमधील (Pakistan) लोक आनंदी नाहीत. भारताची (India) फाळणी ही एक चूक होती. असे ते मान्य करत असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. भारतापासून वेगळे होऊन स्वतंत्र पाकिस्तानला सात दशकांहूनही अधिक काळ लोटला तरी तिथले लोक दुःखी आहेत. परंतु भारतात सूख आहे. असे देखील त्यांनी म्हटले.

पहा व्हिडिओ -

क्रांतिकारक हेमू कालाणी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते. देशाच्या विविध भागातील सिंधी समाजातील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सिंधी समुदायाला भागवत संबोधित करत होते. यावेळी भागवत म्हणाले की, आपल्याला नवा भारत निर्माण करायचा आहे.

भागवत म्हणाले की, ज्याला आपण पाकिस्तान म्हणतोय तिथले लोक म्हणतायत त्यांच्या कट्टरतेमुळे ते भारतापासून वेगळे झाले, संस्कृतीपासून वेगळे झाले. पण ते आता सुखी आहेत का? इथे (भारतात) सुख आहे आणि तिथे (पाकिस्तानात) दु:ख आहे. कारण जे योग्य आहे ते टिकतं आणि चुकीचं आहे ते संपतं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तयार राहा, कसं होईल, काय होईल हे मला माहिती नाही. भारतानं पाकिस्तानवर आक्रमण करावं असं मला वाटत नाही. कारण आपण आक्रमणकारी नाही आहोत. तशी आपली संस्कृती नाही. असेही त्यांनी म्हटले