PassPort: आता पोस्ट ऑफिसमध्येही काढून मिळणार पासपोर्ट, जाणून घ्या कशी आहे प्रक्रिया
India Post

पोस्ट ऑफिसने (Post Office) सामान्य लोकांसाठी मोठी सुविधा सुरू केली आहे.  ही सुविधा पासपोर्ट (Passport) बनवण्यासाठी आहे. आता पासपोर्ट बनवण्यासाठी सामान्य लोकांना पासपोर्ट सेवा केंद्राला (Seva Kendra) भेट देण्याची गरज भासणार नाही. आता तुम्ही हे काम तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये करू शकता. पोस्ट ऑफिसने एक सामान्य सेवा केंद्र सुरू केले आहे. ज्यात आपण आपल्या पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. या संदर्भात इंडिया पोस्टने (India Post) म्हटले आहे की, ज्यांना पासपोर्ट बनवायचा आहे, ते त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन पासपोर्टशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात. पासपोर्टसाठी अर्जही करू शकतात.

हे काम तुमच्या पासपोर्टच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारेही करता येते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही passwordindia.gov.in वर अर्ज करू शकता. तुम्ही या वेबसाइटवर पासपोर्ट फी भरू शकता. येथे सर्व माहिती भरल्यानंतर पासपोर्ट कार्यालयाकडून पोलीस पडताळणी केली जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, आवश्यक कागदपत्रांसह आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जा आणि आपले काम पूर्ण करा.

टपाल विभाग आणि परराष्ट्र मंत्रालयाने सामान्य लोकांच्या सोयीसाठी हे काम सुरू केले आहे. यासाठी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांचे मोठे जाळे उभारण्यात आले आहे. देशाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून पासपोर्ट बनवण्याचे काम वेगाने होऊ शकेल. लोकांना हे काम करण्यासाठी जिल्हा मुख्यालयात जावे लागणार नाही. टपाल विभाग आणि परराष्ट्र मंत्रालयाचा प्रयत्न आहे की सामान्य लोकांना त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट बनवण्याची सुविधा मिळावी. यामुळे लोकांचे पैसे, वेळ आणि श्रम वाचतील. देशात आतापर्यंत 424 पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (POPSK) स्थापन झाले आहेत. यापैकी 65 सेवा केंद्रे अशी आहेत जी खास ओळखल्या गेलेल्या जिल्ह्यांमध्ये उभारली गेली आहेत.

Passportindia.gov.in वर याचे तपशीलवार वर्णन केले आहे. या अधिकृत वेबसाईटमध्ये म्हटले आहे की पासपोर्ट सेवा केंद्र आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा ही केंद्र सरकारच्या पासपोर्ट कार्यालयाची संलग्न संस्था आहे जिथे कोणतीही व्यक्ती पासपोर्ट जारी करण्यासाठी अर्ज करू शकते. टोकन देण्यापासून ते या केंद्रांवर पासपोर्ट बनवण्यापर्यंत, पासपोर्टशी संबंधित सर्व कामे करता येतात. टोकन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रातून नवीन पासपोर्ट काढण्यासाठी किंवा पासपोर्ट पुन्हा जारी करण्यासाठी मिळवता येतो.