Helium balloons explode in Chennai (Photo Credits: ANI)

Helium Balloons Exploded: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi's Birthday) यांचा गुरूवारी 70 वा वाढदिवस (Birthday) साजरा करण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध ठिकाणी भाजपने कार्यक्रमांच आयोजन केलं होतं. परंतु, मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजिक करण्यात आलेल्या कार्यक्रमाला गालबोट लागलं.

तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्याचा स्फोट(Helium Balloons Exploded) झाल्याने भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी झाल्याची घटना घडली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Coronavirus Cases In India: भारतात कोरोनाग्रस्तांनी पार केला 53 लाखांचा आकडा; गेल्या 24 तासात 93,337 नवे कोरोनाग्रस्त, तर 1,247 जणांचा मृत्यू)

प्राप्त माहितीनुसार, चेन्नईमध्ये भाजपाच्या वतीने नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंबात्तूर परिसरात होत असलेल्या या कार्यक्रमात जवळपास 2 हजार हेलियम गॅसचे फुगे आकाशात सोडण्यात येणार होते. परंतु, या दरम्यान, फुग्याचा मोठा स्फोट झाला. यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेले अनेक कार्यकर्ते जखमी झाले. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेत जखमी झालेल्या कार्यकर्त्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.