Photo Credit -X

Operation Blue Star: ऑपरेशन ब्लू स्टार(Operation Blue Star)च्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त, शीख समुदायातील लोकांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिर संकुलात घोषणाबाजी केली. निदर्शनादरम्यान जरनल सिंह भिंडरावाले यांचे पोस्टर पाहायला मिळाले. खलिस्तान समर्थक घोषणाही देण्यात आल्या. तरुणांनी तलवारी उंचावत खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. परिस्थीती चिघळून नये म्हणून पोलिसांनी अंतर्गत सुरक्षा वाढवली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून एक हजाराहून अधिक टास्क फोर्स सदस्य आणि सेवक तैनात केले गेले. पंजाब पोलिसांनीही विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली. साध्या वेशात शेकडो पोलीस आवारात तैनात करण्यात आले आहेत.

आज ऑपरेशन ब्लू स्टारला 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. लष्कराकडून ऑपरेशन ब्लूस्टार या दिवशी सुवर्ण मंदिरात राबवले गेले होते. जर्नेलसिंग भिंडरावाले आणि खलिस्तान समर्थक अतिरेक्यांनी अकाल तख्त हरमंदिर साहिबकडे जाणाऱ्या सैन्याला जोरदार विरोध केला आणि यादरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला.

ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान सुवर्ण मंदिरात मोठा रक्तपात झाला होता. अकाल तख्तचे मोठे नुकसान झाले होते. ऑपरेशनदरम्यान शेकडो सामान्य नागरिकांचा तसेच ८७ भारतीय जवानांचाही मृत्यू झाला होता. हे ऑपरेशन 1 जून ते 10 जून 1984 पर्यंत चालले. लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील दोन जागांवरून खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग आणि इंदिरा गांधींचे मारेकरी बेअंत सिंग यांचा मुलगा सरबजीत सिंग खालसा यांनी विजय मिळवला.