Ambani Security Scare Case: अँटिलिया स्फोटकं प्रकरणी आज NIA ने मुंबई पोलिस निरीक्षक सुनील माने (Sunil Mane) यांना अटक केली आहे. माने यांनी यापूर्वी एटीएसमध्ये (ATS) काम केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माने हा अँटिलिया स्फोटकं गुन्हेगारी कटातील एक भाग होता. मुकेश अंबानी यांचे मुंबईतील निवास्थान अँटिलिया बाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन आणि मनसुख हिरनं हत्या प्रकरणी सध्या एनआयए तपास करत आहे. या तपासत दिवसेंदिवस नव-नवीन खुलासे होत आहेत. यापूर्वी NIA ने सचिन वाझे यांना अटक केली होती. (वाचा - Antilia Case: सीन रिक्रिएटसाठी सचिन वाझे यांना घेऊन NIA टीमने केला Local Train ने प्रवास; पहा व्हिडिओ)
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अँटिलिया बाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणातील संशयित भूमिकेमुळे एनआयएने गुरुवारी मुंबई पोलिस निरीक्षक सुनील माने यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सुनील माने ला आज दुपारी न्यायालयात हजर केले जाईल आणि एनआयएच्या ताब्यात देण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे. यापूर्वी या केंद्रीय एजन्सीने मुंबई पोलिसांचे दोन अधिकारी सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्यासह चार जणांना अटक केली आहे.
Antilia bomb scare case | Inspector of Mumbai Police Crime Branch, Sunil Mane arrested by NIA: NIA official
— ANI (@ANI) April 23, 2021
दरम्यान, सचिन वाझेचा साथीदार असलेल्या पोलीस अधिकारी रियाझ काझी याला एनआयएने 11 एप्रिल रोजी अटक केली होती. पुरावे नष्ट करण्यासाठी सचिन वाझेला मदत केल्याचे एनआयएच्या चौकशीत समोर आलं होतं.