वॉटर पार्क मध्ये निष्काळजीपणा पडला तरूणाला महागात; रवानगी थेट रूग्णालयात
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

राजस्थान मध्ये यंदा उकाड्याने लोक बेहाल आहेत. झालावाड जिल्ह्यातही लोक उन्हाच्या काहिलीने त्रस्त आहे. अशातच उन्हापासून बचावण्यासाठी काही तरूण- तरूणी विकेंडचं औचित्य साधत वॉटर पार्क मध्ये पोहचले होते. पण या मज्जेमध्येच त्यांना सजा झाली. त्यांचा हलगर्जीपणा त्यांच्याच अंगाशी आला आहे.

तरूण मंडळी झालावाड मध्ये मुकुंदरा वॉटर पार्कात आनंद लुटण्यासाठी गेले होते. तेथे वॉटर पार्कच्या स्लायडरने एका तरुणाला दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला. वॉटर पार्कच्या रक्षकांनी तातडीने जखमी तरुणाला पाण्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात नेले.

प्राप्त माहितीनुसार, झालावाडच्या मुकुंदरा वॉटर पार्क मध्ये स्लायडर वर एक तरूणी वेगाने वरून खाली येत होती तर स्लायडरच्या खालच्या बाजूला एक तरूण आपल्याच धुंदीत बसला होता. वरून वेगात आलेल्या तरूणीचा जबर धक्का त्या मुलाला लागला आणि त्याच्या डोक्याला मार लागला. हे देखील नक्की वाचा: अबब...ठाण्यातील सूजर वॉटर पार्कमध्ये आढळली चक्क 7 फूट लांब मगर, पहा व्हिडिओ .

जोरदार धडकेमुळे तरूणाच्या डोक्यातून रक्त आले. तो काही काळ पाण्यातच राहिला. दरम्यान आजूबाजूला उभ्या तरूणांनी आणि सिक्युरिटी गार्ड्सने त्याला बाहेर काढून हॉसिटलमध्ये नेले. आता तो सुरक्षित आहे. पण या घटनेमुळे बेपरवाहीपणे वागणं जीवावर बेतू शकतं हा मोठा सल्ला त्यांना मिळाला आहे.