अष्टांग योगा गुरू Sharath Jois यांचे निधन झाले आहे. अमेरिकेत वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आजोबांकडून मिळालेल्या या अष्टांग योगाला Sharath Jois यांनी जगाच्या कानाकोपर्यात नेले. दरम्यान त्यांची बहीण Sharmila Mahesh आणि University of Virginia मधील त्यांच्या योगा प्रोग्रामचे मॅनेजर John Bultman यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. Charlottesville,मधील युनिव्हर्सिटी कॅम्पस मधील टेकडीवर हायकिंगला गेले असता हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला आहे.
देशा-परदेशामध्ये Sharath Jois यांच्या योगा कार्यक्रमामध्ये अनेकांनी सहभाग घेतला आहे. सामान्य नागरिकांसोबतच अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील अष्टांग योगाचे शिक्षण घेतले आहे. Madonna आणि Gwyneth Paltrow देखील त्यांचे शिष्य होते. Sharath Jois यांचे आजोबा Krishna Pattabhi Jois,यांनी 90 व्या दशकामध्ये अष्टांगयोगाला अधिक लोकप्रिय केले. अष्टांग योग हा योग साधनेतील एक प्रकार आहे. ज्यामध्ये अधिक गतिमान शारीरीक हालचाली होतात त्यामुळे हा व्यायामा सारखा एक प्रकार आहे.
सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, भारतामध्ये डिसेंबर 2024 पासून ते नवी बॅच सुरू करणार होते. त्यांच्या निधनापूर्वी काही काळ आधी त्यांनी सोशल मीडीयात योगा क्लासचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. पुढील वर्षी त्यांचे दुबई आणि सिडनी मध्येही वर्क शॉप्स ठरले होते. अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त आल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
Sharath Jois यांच्या पश्चात त्यांची आई Saraswathi Jois, वडील Rangaswamy, पत्नी Shruti Jois आणि दोन मुलं आहेत.
शरथ जोईस यांचा जन्म 29 सप्टेंबर 1971 रोजी म्हैसूर मध्ये झाला होता. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा केला. त्यांनी त्यांचे आजोबा पट्टाभी जोईस यांच्याकडून अष्टांग योग शिकला आणि वयाच्या 19 व्या वर्षापासून त्यांच्या हाताखाली सराव सुरू केला. 2009 मध्ये त्यांच्या आजोबांचे निधन झाल्यानंतर, शरथ जोईस यांनी विद्यार्थ्यांना योग शिकवणे सुरू ठेवले आणि म्हैसूरच्या बाहेरील हेब्बलमध्ये शरथ योग केंद्राची स्थापना केली. येथे ते विद्यार्थ्यांना योग शिकवत असत.