Moscow News: रशिया येथील मॉस्को शहराच्या उत्तरेला एक खासगी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विमानात दहा प्रवाशी प्रवास करत होते. त्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी वॅग्नर नेते येवगेनी प्रीगोझिन यांच्याही मृत्यू झाला असेल असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. हा दुर्दैवी अपघात मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथे घडला आहे. मॉस्को शहरापासून शंभर किलोमीटर दूर अंतरावर हा अपघात झाल्याची नोंद झाली आहे. हे विमान प्रीगोझिनचे असल्याचे सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.
अपघात झालेल्या विमानात तीन पायलेट आणि सात प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे. या विमानाचा अपघात कसा झाला आहे? याचा शोध घेतला जात आहे. विमान अपघातग्रस्त झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वॅगनर हे गेल्या अनेक वर्षापासून ते लष्करी आणि गुप्तचर कारवायांबाबतही वादात सापडले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात येवगेनी प्रीगोझिन यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. त्यानंतर हे बंड त्यांनी मागे घेतले होते. पुतिन यांनी प्रीगोझिनला देशद्रोही असे संबोधले होते. अपघात ग्रस्त विमान हे वॅग्नर या खासगी कंपनीचे होते. पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली आहे. रशियन तपास संस्थाकडून पुढील तपासणी सुरु केली आहे.