World Cup 2023: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव लागला जिव्हारी, तिरुपती येथे चाहत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Dead-pixabay

विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाल्यानंतर, 19 नोव्हेंबर रोजी, रविवारी रात्री उशिरा तिरुपती येथे एका चाहत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.ज्योतिष कुमार यादव (35) हे बंगळुरू येथे सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होते आणि दीपावलीच्या सुट्टीसाठी तिरुपती या त्यांच्या गावी आले होते. भारत पिछाडीवर पडताना पाहून तो संपूर्ण सामना तणावात होता आणि अखेर सामना संपल्यानंतर तो कोसळला. त्यांना तत्काळ तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर रामनारायण रुईया शासकीय सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्या ठिकाणी त्यांना मृत घोषीत करण्यात आले. (हेही वाचा - Skill Development Scam Case: TDPचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना दिलासा, आंध्र प्रदेशातील उच्च न्यायालयातून जामिन मंजूर)

दरम्यान, तिरुपती नागरी विकास प्राधिकरण (TUDA) चे अध्यक्ष मोहित रेड्डी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोमवारी तिरुपती ग्रामीण मंडळातील दुर्गासमुद्रम गावात (त्यांच्या चंद्रगिरी मतदारसंघात येणारे) निवासस्थानी भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी राज्य सरकारच्या वतीने कुटुंबाला सर्वतोपरी मदत देऊ केली.