फोन वरुन व्हिडिओ पाहून अविवाहित गर्भवतीकडून मुलाला जन्म देण्याचा प्रयत्न, महिलेचा मृत्यू
Image used for representational purpose | Photo Credits: File Photo

उत्तर प्रदेशात (Utter Pradesh) गोरखपुर येथे घरात एकटी राहणाऱ्या अविवाहित गर्भवती महिलेने मुलाला जन्म देण्यासाठी फोनवरुन व्हिडिओ पाहून प्रसुती करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणी महिलेचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी सोमवारी बहराइच येथे राहणारी ही महिला गेल्या चार वर्षांपासून गोरखपूर येथे राहत होती. तसेच काही परिक्षांच्या बाबत तयारी करत होती. परंतु चार दिवसांपूर्वीच या महिलेने बिलंदपूर येथे भाड्याने खोली विकत घेतली होती. मात्र रविवारी अचानक तिच्या खोलीतून रक्त वाहू लागल्याने घरातील अन्य भाडेकरुंना धक्का बसला. परिसरातील आजूबाजूची मंडळी जमा झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेबद्दल सांगितले. तसेच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून महिला आणि तिच्या मुलगा रक्ताने माखलेला दिसून आला. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून तिचे शरीर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.(हेही वाचा-सावळा रंग असल्याने त्रस्त झालेल्या मुलीची आत्महत्या, मृत मुलीला पाहून वडिलांना हृदयविकाराचा झटका)

महिलेला गर्भपात करायचे नसल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. तसेच पोलिसांत या प्रकरणी अद्याप तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. त्याचसोबत महिला ज्या व्यक्तीपासून गर्भवती झाली होती याबद्दल अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.