झारखंड (Jharkhand) येथील एका गावातील 20 वर्षीय मुलीने ती सावळ्या रंगाची असल्याच्या चिंतेमुळे गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. मात्र जेव्ही ही गोष्ट वडिलांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिली असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
श्वेता कुमारी असे या मुलीचे नाव आहे. श्वेता ही गेल्या काही दिवसांपासून आपला रंग सावळा असल्याने त्रस्त होती. तसेच दोन-तीन वेळा तिच्या लग्नाबद्दल बोलणी करण्यात आली होती. मात्र ती सावळी असल्याने तिला वरांकडून नकार येत होते. हेच कारण मनात ठेवून श्वेता हिने घरातील मंडळी बाहेर गेल्याची वेळ साधून गळफास लावून आत्महत्या केली. तर वडिल कामावरु घरी आल्यावर घराचा दरवाजा ठोठावू लागले होते. परंतु कोणीही दरवाजा उघडण्यास पुढे न आल्याने त्यांनी अखेर दरवाजा तोडला. त्यावेळी श्वेता हिने घरात गळफास लावून घेतल्याने वडिलांनी पाहिल्याने त्यांना जागच्या जागीच हृदयविकाराचा झटका आला. तर श्वेता हिच्या वडिलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(हेही वाचा-मृत व्यक्तीचा आत्मा घेऊन जाण्यासाठी तांत्रिकाकडून रुग्णालयात पूजा)
तसेच श्वेता हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी तिच्या वडिलांशी पोलिसांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पोलिसांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी नाकारले आहे.