Female | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

राजस्थान (Rajasthan) मधील नागौर (Nagaur)  जिल्ह्यातील लाडनू कस्बे मधील एका महिलेवर मध्य प्रदेशातील एका महिलेने लग्नाची जबरदस्ती केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. नागौरचे पोलिस अधिक्षक राममूर्ती जोशी यांच्या माहितीनुसार, दोन्ही महिलांची एकमेकांसोबत सोशल मीडीयामधून ओळख झाली. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या मुलीकडून दुसरीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी दबाव ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे.

पीडित मुलीला मागणी मान्य न केल्यास सोशल मीडीयामध्ये बदनामी करण्याची आणि सोशल मीडीया चॅट्सचे स्क्रिनशॉर्ट्स वायरल करण्याची धमकी दिली होती. पोलिस अधिकार्‍याच्या माहितीनुसार महिलेवर 10 लाख रूपये मागितल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. दोन्ही महिला आधारण 21 ते 25 वयाच्या आहेत.

शनिवारच्या रात्री लाडनू मध्ये महिलेच्या घरी पोहचत दुसरीने हंगामा केला. तिच्या वर लग्नासाठी दबाव टाकला. सोबत जाण्यासाठी मजबूर देखील केले. पीडीत मुलगी आणि तिचे कुटुंबिय रविवारी पोलिस स्टेशन मध्ये घुसले. त्यांनी तेथे महिलेवर घरात घुसून वसुली करण्याच्या आरोपाखाली तक्रार नोंदवली. आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.