संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of Parliament) यंदा येत्या 7 ते 29 डिसेंबर या कालावधीत पार पडणा आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Minister Pralhad Joshi) यांनी ही माहिती दिली. यंदाचे हिवाळी अधिवेशन केवळ 23 दिवसाचे असणार आहे, असेही संसदीय कामकाज मंत्र्यांच्या माहितीवरुन पुढे येते. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचे हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर 2022 पासून सुरू होईल 29 डिसेंबर रोजी संपेल. या एकूण आणि 23 दिवसांत प्रत्यक्ष कामकाज 17 दिवस चालेल असे दिसते. त्यापैकी एकूण कामकाजांच्या दिवसांमध्ये 17 बैठका पार पढतील. संसदेच्या अमृत काळात अधिवेशनादरम्यान विधिमंडळ कामकाज आणि इतर बाबींवर चर्चेची अपेक्षा आहे. खास करुन रचनात्मक चर्चेची अपेक्षा आहे, असे केंद्रीय मंत्री यांनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे.
विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब होण्याची शक्यता आहे. नुकतेच निधन झालेल्या विद्यमान खासदारांमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचाही समावेश आहे. (हेही वाचा, New Parliament Building Ashok Pillar: औरंगाबादचा शिल्पकाराने साकारली संसदेच्या नवीन इमारतीवरील अशोक स्तंभाची भव्य प्रतिकृती)
सूत्रांनी असेही म्हटले आहे की कोविड संख्येत लक्षणीय घट झाली आहे आणि लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयातील बहुतेक सदस्य आणि कर्मचारी पूर्णपणे लसीकरण झाले आहेत, त्यामुळे अधिवेशन कोणत्याही मोठ्या कोविड-प्रेरित निर्बंधांशिवाय बोलावले जाण्याची शक्यता आहे.