National Digital Health Mission| Photo Credits: Twitter

भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'National Digital Health Mission'ची घोषणा केली आहे. दरम्यान या नव्या योजनेचा आजपासून देशात प्रारंभ होत असल्याची घोषणा नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत आता प्रत्येक भारतीयाचे एक हेल्थ आयडी (Health Id) बनवले जाणार आहे. Independence Day 2020: 'आत्मनिर्भर भारत हा 130 कोटी भारतीयांचा मंत्र बनला आहे'; स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाल किल्ल्यावरुन देशावासियांशी संवाद

नरेंद्र मोदी यांनी भारताची आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं म्हटलं आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या कार्डमध्ये रूग्णाच्या सार्‍या मेडिकल कंडीशनची माहिती असतील. तसेच कुठे उपचार झाले? कोणती औषधं देण्यात आली याचीदेखील यामध्ये माहिती असेल. हेल्थ आयडीचा वापर करून आता भारतीयांना सहज आरोग्य सुविधांचा वापर करता येईल तसेच औषधं उपलब्ध करून घेता येतील.

Health ID card कशासाठी?  

  • भारतीयांना नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अंतर्गत आता हेल्थ आयडी कार्ड दिले जाईल.
  • प्रत्येक वेळेस डॉक्टरांकडे जाताना, फार्मसीमध्ये गेल्यावर या कार्डच्या माध्यामातून लॉग ईन करता येईल.
  • डॉक्टरांची अपॉंईटमेंट ते औषधं याची माहिती हेल्थ प्रोफाईलच्या माध्यमातून बनवली जाईल.
  • दरम्यान प्रत्येकाच्या आरोग्याची माहिती ही गुप्त ठेवली जाणार आहे.
  • डॉक्टरांना लिमिटेड टाईम अ‍ॅक्सेस दिला जाणार आहे. तसेच त्यासाठी वेगळी सोय असेल.
  • देशातील कुठल्याही काना कोपर्‍यामधून  कार्ड वापरून टेलि फार्मसी, टेलि मेडिकलचा वापर करून आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल.

आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आता The National Digital Health Mission असेल. दरम्यान देशामध्ये आता आरोग्य सुविधा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि फायदेशीर बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.