Governor Jagdeep Dhankhar AND PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 (West Bengal Assembly Election 2021) चे निकाल हाती आले. हाती आलेल्या निकालावरुन दिसते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे बंगालमध्ये सत्तांतर करण्याचे स्वप्न बंगाली जनतेने धुळीला मिळवले. जनमताने दिलेल्या आदेशानुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाचीच सत्ता कायम राहणार आहे. दरम्यान, या जनादेशानंतर पश्चिम बंगालधून सातत्याने वृत्त येत आहे की, राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार (West Bengal Violence) सुरु आहे. भारतीय जनता पक्षानेही आरोप केला आहे की, बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगाल राज्याचे राज्यपाल जगदीप धनखड (Governor Jagdeep Dhankhar ) यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.

वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली. राज्यपाल धनखड यांनी मंगळवारी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी फोन करुन राज्यातील हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली. पश्चिम बंगालच्या राज्यपालांसोबत पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधल्याच्या एक दिवस आगोदर केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यातीर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा एक अहवाल मागवला आहे. गृह मंत्रालयाने सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात विस्तृत अहवाल देण्याबाबत सांगण्यात आले आहे. (हेही वाचा, पराभूत होऊनही जिंकलेल्या ममता बॅनर्जी मुख्यमंत्री कशा होणार?, जाणून घ्या सविस्तर)

भारतीय जनता पक्षाच्या काही उमेदवारांच्या घरे आणि वाहनांची कथीत तोडफोड करण्यात आल्याचेही वृत्त आहे. आरमबाग यथे एका पक्ष कार्यालयाला आग लावल्याचे वृत्त आहे. नंदीग्रामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभूत करणाऱ्या सुवेंदु अधिकारी यांच्या वाहनावरही मोठा हल्ला करण्यात आला आहे, असे वत्त आहे. दरम्यान, हिंसेनंतर तृणमूल काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या घटनांशी तृणमूल काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही.