Weather Update: दिल्लीकरांना अखेर कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीत सकाळपासून जोरदार थंड वारे आणि रिमझिम पाऊस सुरू आहे. गुरुवारी, 20 जून रोजी सकाळी दिल्ली आणि नोएडाच्या काही भागात हलका पाऊस झाला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी दिल्ली-NCR आणि लगतच्या विविध भागांमध्ये हलका ते मध्यम तीव्रतेचा पाऊस आणि वाऱ्याचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने जारी केलेल्या ताज्या अपडेटनुसार, उत्तर दिल्ली, उत्तर-पूर्व दिल्ली, उत्तर-पश्चिम दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि मध्य दिल्लीत पुढील दोन तासांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने X वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "उत्तर दिल्ली, उत्तर-पूर्व दिल्ली, उत्तर-पश्चिम दिल्ली, पश्चिम दिल्ली, मध्य दिल्ली, NCR (लोनी देहाट, हिंडन एएफ स्टेशन, बहादुरगढ) च्या काही ठिकाणी आणि लगतच्या भागात हलका पाऊस पडला आहे." "ताशी 20-30 किलोमीटर वेगाने मध्यम तीव्रतेचा पाऊस आणि वारे वाहतील."
पाहा पोस्ट:
20/06/2024: 07:10 IST; Light to moderate intensity rain and winds with speed of 20-30 Km/h would occur over and adjoining areas of few places of North Delhi, North-East Delhi, North-West Delhi, West Delhi, Central-Delhi , NCR ( Loni Dehat, Hindon AF Station, Bahadurgarh,
— India Meteorological Department (@Indiametdept) June 20, 2024
हरियाणातील मानेसर, बल्लभगड, सोनीपत, खारखोडा, मत्तनहेल, झज्जर, फारुखनगर, सोहाना आणि पलवल आणि उत्तर प्रदेशातील बरौत, बागपत, मेरठ, खेकरा, मोदीनगर, किथोरे, पिलखुआ, हापूर, गुलोटी, सिकंदराबाद येथे पुढील दोन तासांत पावसाची शक्यता असा अंदाजही आयएमडीने वर्तवला आहे .
आयएमडीच्या मते, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पुढील काही दिवसांत अत्यंत आवश्यक आराम मिळू शकतो. याशिवाय आता मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी 12 ते 18 जून दरम्यान मान्सूनने विशेष प्रगती केली नव्हती, त्यामुळे उत्तर भारतात पावसाची प्रतीक्षा वाढली आहे.
मान्सून अपडेट
हवामान खात्याने मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे सांगितले. येत्या तीन ते चार दिवसांत महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, उत्तर-पश्चिम बंगालचा उपसागर, बिहार आणि झारखंडमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत उष्माघाताने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली
राजधानी दिल्लीत भीषण उष्मा सुरू असतानाच उष्माघातामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या आणि रुग्णालयांमध्ये त्याचा त्रास सहन करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या ४८ तासांत दिल्लीच्या विविध भागांतून ५० जणांचे मृतदेह सापडले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मात्र, या सर्वांचा मृत्यू उष्णतेमुळे झाला की नाही याची पुष्टी पोलिस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेली नाही.