विशाखापट्टनम: कोस्ट गार्डच्या जहाजाला भीषण आग;  28 लोकांची सुखरूप सुटका, एक बेपत्ता (व्हिडिओ)
Coastal Jaguar | (Photo Credits: ANI)

विशाखापट्टनम (Visakhapatnam) राज्यात कोस्ट गार्डच्या (Indian Coast Guard)  एका जहाजाला सोमवारी (12 ऑगस्ट 2019) सकाळी 11.30 च्या समुारास भीषण आग लागली. या जहाजावर 29 क्रू मेंबर्स होते. आगीपासून बचवा करण्यासाठी जहाजावरील 29 क्रू मेंबर्सनी पाण्यात उड्या मारल्या. त्यापैकी 28 जणांची सुखरुप सुटका करण्यास यश आले. तर, एक जण अद्याप बेपत्ता आहे. बेपत्ता क्रू मेंबरचा शोध सुरु आहे. ही घटना

जहाजावरील आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार जहाजावरील आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे. एएनआय न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, हे जहाज पाण्यात उतरल्यानंतर आगीच्या भक्षस्थानी पडले. त्यामुळे जहाजावरील 29 जणांना स्वसंरक्षणार्थ पाण्यात उड्या माराव्या लागल्या. (हेही वाचा, Mumbai Fire: माझगाव डॉक येथील रिकाम्या जहाजाला आग; एका व्यक्तीचा मृत्यू)

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट

प्राप्त माहितीनुसार, जहाजाला आग लागल्यामुळे क्रू मेंबर्सनी पाण्यात उडी घेतली. इंजियन कोस्ट गार्ड ने 28 जणांचा बचाव केला आहे. मात्र, एक क्रू मेंबर अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरु आहे. जहाजाला आग लागण्याचे नेमके कारण काय हे मात्र अद्याप समजू शकले नाही.