गँगस्टर विकास दुबे (Vikas Dubey) याचा मृत्यू रक्तस्त्राव (Haemorrhage) आणि धक्का (Shock) बसल्याने झाल्याचे पुढे आले आहे. पोलीस एन्काऊंटरमध्ये विकास दुबे (Vikas Dubey Encounter) मारला गेला. विकास दुबे याचा शवविच्छेदन अहवाल (Vikas Dubey Postmortem Report) सोमवारी (20 जुलै 2020) रोजी प्रसारमाध्यमांना प्राप्त झाला. या अहवालत पुढे आले आहे की, विकास दुबे याच्या शरीरावर 10 जखमा होत्या. गोळी लागल्याने झालेल्या अतीरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे की, एन्काऊंटर वेळी विकास दुबे याच्या शरीरातून बंदुकीच्या 3 गोळ्या आरपार गेल्या. त्याच्या शरीरावर 10 जखमांच्या खुणा आढळून आल्या. पहिली गोळी डावा खांदा आणि इतर दोन गोळ्या छातीत उजव्या बाजूला लागल्या. न्यायवैध्यकीय तज्ज्ञांचा माहितीनुसार, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये (शवविच्छेदन अहवाल) 10 जखमांचा उल्लेख आहे. त्यातील 6 जखमा या गोळी लागल्याने झाल्या आहेत. (हेही वाचा, Kanpur Encounter Case: विकास दुबे याचा फायनान्सर जय बाजपेयी याला अटक; दोघांच्या बँक खात्यावरुन 75 कोटी रुपयांचे व्यवाहर झाल्याची माहिती)
कानपूर येथील बिकरु गावात 2 जुलैच्या मध्यरात्री विकास दुबे याच्या घरी त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर विकास दुबे याने आपल्या साथिदारांसह हल्ला केला. यात 8 पोलीस करमचारी मारले गेले. विकास दुबे याला पोलीस कारवाईसाठी येणार असल्याची माहिती आगोदरच मिळाली होती. त्यामुळे आपल्या हस्तकांना घेऊन त्याने सापळा रचला होता, अशी माहिती पुढे आली आहे.
Postmortem report of history-sheeter #VikasDubey states 'hemorrhage and shock due to ante-mortem firearm injuries' as the cause of his death.
He was wanted in #KanpurEncounter case and was killed in a Police encounter on July 10th.
— ANI UP (@ANINewsUP) July 20, 2020
दरम्यान, या घटनेनंतर मध्यप्रदेश पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याच्या इतर साथीदारांना एक एक करुन ठार मारले. काहींना अटकही केली. विकास दुबे याला मध्य प्रदेश येथील उज्जैन येथील महाकाल मंदिर परिसरात अटक करण्यात आली. उज्जैन येथून कानपूरला घेऊन येत असताना पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत तो मारला गेला.