Vande Bharat Express, Pm Modi (PC - X, ,facebook)

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Train) ची वाट पाहत असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबर रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथून देशातील विविध राज्यांसाठी 10 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये पुणे ते नागपुर, टाटानगर ते पाटणा, वाराणसी ते देवघर आणि आग्रा ते वाराणसी दरम्यानच्या वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे. आपल्या जागतिक दर्जाच्या सुविधा आणि हाय-स्पीड क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे भारतीय रेल्वे प्रवासासाठी एक गेम चेंजर म्हणून सर्वत्र कौतुक केले जाते, ज्यामुळे प्रवाशांना उत्तम प्रवासाचा अनुभव मिळतो.

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने पुष्टी केली की या नवीन सेवा भारताच्या रेल्वे नेटवर्कचे आधुनिकीकरण आणि वेग वाढवण्याच्या व्यापक राष्ट्रीय उपक्रमाचा भाग आहेत. या गाड्या झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमधील विविध स्थानकांवरून धावतील. (हेही वाचा: Mumbai Ring Roads: लवकरच मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा! शहराभोवती बांधले जाणार 5 रिंग रोड, जाणून घ्या मार्ग)

या मार्गांवर नवीन वंदे भारत ट्रेन धावतील-

टाटानगर-पाटणा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

वाराणसी-देवघर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

टाटानगर-ब्रह्मपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

रांची-गोड्डा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

आग्रा-बनारस वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

हावडा-गया वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

हावडा-भागलपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

दुर्ग-विशाखापट्टणम वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

हुबळी-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

पुणे-नागपूर या नवीन मार्गांमुळे महाराष्ट्रातील वंदे भारत गाड्यांची संख्या सात होईल. या नवीन गाड्यांमुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल आणि प्रवाशांना जलद, अधिक आरामदायी प्रवास पर्याय उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.