Dog (Representational Image; Photo Credit: Pixabay) Lucknow,

उत्तर प्रदेशमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात एका आठ वर्षाच्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे. ही घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील कुबी या गावात घडली आहे. पीडित मुलगा इयत्ता तिसरीत शिकत होता. या पीडित मुलावर कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. कुत्रे चावल्यामुळे त्याला जीव गमवावा (Child Killed In Dog Attack) लागला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुबी गावात शेतातून घरी परतणाऱ्या आठ वर्षीय शिववर कुत्र्यांनी हल्ला केला. (हेही वाचा - Kanpur Stray Dog Attacks: कानपूरमध्ये मंदिरात जाणाऱ्या 11 वर्षीय मुलावर कुत्र्यांचा हल्ला, चिमुकला गंभीर जखमी)

शिवचे वडील सचिन कुमार शेतकरी आहेत. रविवारी सायंकाळी सचिनची पत्नी सीमा शेतात जनावरांसाठी चारा गोळा करण्यासाठी गेली होती. तिच्यासोबत त्यांच्या आठ वर्षीय मुलगा शीवही शेतात गेला होता. घरी परतत असताना तो दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेताजवळ पोहोचला असता भटक्या कुत्र्यांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे लचके तोडले. या हल्ल्यात शीव भयंकर जखमी झाला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता.

शीवच्या तोंडावर, डोक्यावर आणि पायाला खोल जखमा झाल्या होत्या. यात शिवाचा जागीच मृत्यू झाला. थोड्या वेळाने शीवची आई चारा घेऊन दुसऱ्या रस्त्याने घरी परतली. परंतु तिला शीव घरात दिवला नाही. त्यामुळं तिने परिसरात शोधाशोध सुरू केली असता शेतात त्याचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे मृत मुलाच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला.