बाईक स्टंट करताना धुळ उडाल्याने संतप्त झालेल्या शेजाऱ्याने तरुणाला भोकसले
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Facebook)

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एक तरुण बाईक स्टंट करत असताना धुळ उडाल्याने शेजारी राहणारे रहिवाशी संतप्त झाले. त्यामुळे संतापलेल्या शेजाऱ्याने बाईक स्टंट करणाऱ्या तरुणाला चक्क त्याच्या घरात जाऊन भोकसल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वी सुद्धा तरुणासोबत एका खेळादरम्यान काही कारणावरुन वाद झाल्याचे पीडित परिवाराने सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपिंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती देत असे म्हटले की, शाम पटाडी गावात रोहित गावात आल्यानंतर त्याने घराजवळच बाईक स्टंट केला. त्यामुळे जमिनीवरील धूळ उडाली असता तेथे काहीजण उपस्थितीत होते. त्यांनी धूळ उडाल्यामुळे राग व्यक्त केला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. मात्र वाद झाल्याच्या काही वेळानंतर 5 जण काठ्यादांड्या घेऊन रोहित याच्या घरात घुसून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र रोहितने याचा विरोध केला असता एकाने त्याच्यावर चाकू हल्ला केला. रोहित त्यावेळी गंभीर जखमी झालेला पाहून आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकारानंतर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेय मात्र उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.(धक्कादायक! पत्नीचा इतर पुरुषांसोबत लीक झालेला अश्लील व्हिडिओ पाहून पतीने केली आत्महत्या)

आरोपीच्या भावाने शेजाऱ्यांसह त्यांचा सख्ख्या भावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप आरोपींना पकडण्यात यश आले नसून त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा शुल्लक कारणावरुन हत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.