Mistranslations Make Jokes: कर्नाटक हायवे साइनबोर्डवर चुकीचे भाषांतर; 'Urgent Makes An Accident' लिहिलेला विनोदी फलक सोशल मीडियावर व्हायरल
Mistranslations Make Jokes (Photo Credit:- X)

शब्दांचे अर्थ लावणे ही साधी आणि सोपी गोष्ट नाही. त्यातही ती भाषा जर आपली नसेल आणि त्याचे भाषांतर (Translation) केले जात असेल तर अर्थाच्या दृष्टीने निर्माण होणारी जोखीम काहीशी अधिक. आजकाल अनेक लोक अनुवादकाची मदत न घेता थेट गूगल टॅन्सलेटर किंवा तत्सम प्रणालीचा वापर करतात. त्यामुळे भाषक आकलनाच्या चुका (Mistranslations) होतात आणि विनोदनिर्मीती (Humorous Translation) होते. सोबतच अर्थभिन्नता आणि चुकीचा संदेश जातो ते वेगळेच. कर्नाटक (Karnataka) राज्यातील कोडागू जवळील एका महामार्गावर याची प्रचिती अनेक प्रवाशांना येते आहे. या महामार्गावर रस्ता प्रशासनाने अपघात आणि आपत्कालीन सेवेबद्दल फलकाद्वारे (Karnataka Highway Warning Signboard) दिलेली महिती कन्नड भाषेतून इंग्रजीमध्ये भाषांतरीत केली आहे. हे भाषांतर चुकीच्या पद्धतीने झाल्याने अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

"तत्काळ अपघात करा"

कोडागूजवळी महामार्गावरील साईनबोर्ड सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. या बोर्डवरुन विनोद केले जात आहेत. 'कोडागू कनेक्ट' नावाच्या एक्स (जुने ट्विटर) वापरकर्त्याने या साईनबोर्टचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर लिहिले आहे, ''Urgent Makes An Accident'' म्हणजेच मराठीत सांगायचे "तत्काळ अपघात करा". साईनबोर्डवर विनोदाचा विषय ठरलेले वाक्य हे 'अवसरावे अपघतके करण' (Avasarave Apaghatakke Karana) या कन्नड वाक्याचे इग्रजीत भाषांतर आहे. ज्याचा अर्थ "ओव्हरस्पीडिंग हे अपघातांचे कारण आहे" असा होतो. पण, इंग्रजी भाषेत भाषांतर करताना भाषांतरकराने भलताच गोधळ घातला आहे. (हेही वाचा, Instagram च्या नव्या फिचरची घोषणा; Story Posts मधील पोस्ट ऑटोमेटिकली होणार ट्रान्सलेट)

दरम्यान, लेटेस्टली मराठीने या व्हायरल प्रतिमेची सत्यता पडताळली नाही. "तातडीने अपघात होतो" या चुकीच्या भाषांतराने इंटरनेटवर फिरकी घेण्यास नेटीझन्सना कारण दिले आहे. काहींनी इंग्रजीमध्ये साइनबोर्डचे भाषांतर करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर काहींना ही त्रुटी मनोरंजक वाटली आणि त्यावरुन त्यांनी चांगलीच फिरकी घेतली.

एक्स पोस्ट

वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया

एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, "'घाई हे अपघाताचे कारण आहे' हे खरे भाषांतर आहे."

दुसऱ्याने विनोद केला, भाऊ ह्यासाठी देखील chatgpt वापरला काय?

तिसऱ्याने टिपणी केली, "कन्नड महत्त्वाचे आहे, इंग्रजी नाही."

चौथ्याने लिहिले, "'अर्जंट' नंतर एक स्वल्पविराम आणि अर्थ पूर्णपणे बदलेल."

पाचव्या वापरकर्त्याने टोमणा मारला की, "उत्तम टॅग इन्शुरन्स एजंट्स. ते लवकर निराकरण करतील."

दरम्यान, कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यातील स्थानिकांनी Google नकाशे नेव्हिगेशन चुकल्याबद्दल प्रवाशांना चेतावणी देणारा तात्पुरता साइनबोर्ड मार्चमध्ये लावला. साइनबोर्डने वापरकर्त्यांना Google च्या निर्देशांचे पालन न करण्याचे आणि क्लब महिंद्रा रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी वेगळा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. कोडागु कनेक्टच्या एक्स हँडलने शेअर केलेल्या साइनबोर्डचे चित्र, "गुगल चुकीचे आहे. हा रस्ता क्लब महिंद्राकडे जात नाही." गुगल मॅपद्वारे दिशाभूल करून दिशा विचारून हरवलेल्या प्रवाशांना कंटाळलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी हा साईनबोर्ड लावला होता.