
केंद्रीय लोकसेवा आयोग ( Union Public Service Commission) कडून आज (22 एप्रिल) Civil Services Examination, 2024 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालामधून एकूण 1009 जणांच्या निवडीची घोषणा करण्यात आली आहे. या निकालामध्ये प्रयागराज मधील शक्ती दुबे (Shakti Dubey) देशात अव्वल ठरली आहे. शक्तीच्या पाठोपाठ देशात Harshita Goyal दुसर्या तर Dongre Archit Parag तिसर्या स्थानी आहे. यूपीएससी च्या यादी मध्ये निवडलेल्या 1009 जणांची क्रमवारीनुसार यादी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच आयोगाने 230 उमेदवारांची राखीव यादी देखील तयार केली आहे.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि इतर Group 'A' आणि Group 'B' केंद्रीय सेवांमध्ये प्रमुख पदांवर नियुक्तीसाठी एकूण 1009 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. इथे पहा संपूर्ण यादी.
यूपीएससी टॉपर्सच्या पहिल्या 5 यादीत 3 मुलींनी स्थान मिळवले आहे. पहिल्या 10 मध्ये 4 मुलींचा समावेश आहे. नक्की वाचा: UPSC Final Result 2024: UPSC सिव्हिल सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, कसा पहाल निकाल?
टॉपर शक्ती दुबे कोण?
शक्ती दुबे च्या मॉक मुलाखतीच्या माहितीनुसार, तिचे शालेय शिक्षण प्रयागराज येथून झाले आहे. याशिवाय तिने अलाहाबाद विद्यापीठातून पदवी मिळवली आहे. त्याच वेळी, तिने 2018 मध्ये बीएचयूमधून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.शक्ती दुबे 2018 पासून तयारी करत होती. तिने राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय पर्यायी विषय म्हणून ठेवले होते.
पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा
पुण्याचा अर्चित पराग डोंगरे ने वेल्लोरच्या व्हीआयटीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) केले आहे, त्याने philosophy हा पर्यायी विषय घेतला होता. अर्चित देशात तिसरा आणि मुलांमध्ये पहिला आला आहे.
उत्तीर्ण उमेदवारांच्या गुणांचा निकाल सुमारे 15 दिवसांनी जाहीर केला जाऊ शकतो. यूपीएससी 2024 परीक्षेसाठी मुलाखती 17 एप्रिलपर्यंत घेण्यात आल्या. त्याची सुरुवात 7 जानेवारी 2025 पासून झाली. 2024 मध्ये, यूपीएससीने आयएएस, आयपीएससह अनेक सेवांमध्ये 1132 पदांसाठी भरतीची घोषणा केली होती.