Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये कोरोना वायरस लाटेच्या दुसर्‍या लाटेमुळे देशात चिंताजनक स्थिती बनलेली असताना त्याचा परिणाम यंदाच्या शैक्षणिक वर्षावर देखील झाला आहे. यंदाची यूपीएससीची परीक्षा आता लांबणीवर पडली आहे. 27 जून दिवशी आयोजित करण्यात आलेली नागरी सेवा पूर्व परीक्षा (Prelims Exam) आता 10 ऑक्टोबर दिवशी होणार आहे. आज त्याबाबातचे Union Public Service Commission (UPSC) ने पत्रक जारी केले आहे.

दरम्यान आज युपीएससीने या परीक्षा लांबणीवर टाकण्याबाबतचं नोटिफिकेशन जारी करताना देशातील कोरोना परिस्थितीचा दाखला देत ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे म्हटलं आहे. UPSC Civil Services Examination 2021 ही 712 रिक्त पदांसाठी आयोजित करण्यात आली आहे यामध्ये 22 रिक्त जागा या दिव्यांगांसाठी देखील आहेत.

मागील वर्षी दएखील सिव्हिल सर्व्हिस परीक्षा 31 मे दिवशीची परीक्षा 4 ऑक्टोबरला रिशेड्युल करण्यात आली होती. आतापर्यंत मेन्सची लेखी परीक्षा पार पडली आहे. तर मुलाखत फेरी देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

युपीएससी दरवर्षी परीक्षा घेऊन Preliminary, Main आणि Interview या तीन टप्प्यांत निकाल लावते. त्यानंतर पात्र उमेदवारांची IAS, IPS, IFS मध्ये निवड केली जाते. IAS ही देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक आहे. त्याची प्रिलिम्स ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षेच्या स्वरूपात ऑफलाईन आणि पेन पेअर मोड मध्ये घेतली जाते. या प्रिलिम्स मध्ये 2 पेपर असतात ते दोन्ही क्वालिफाईंग असतात. म्हणजे त्यामधील मार्कांवरून पुढील टप्प्यांमध्ये निवड होणार की नाही हे ठरते.