उत्तर प्रदेश राज्यातील बहराईच येथून धक्कादायक घटना पुढे येत आहे. येथील विश्वेश्वरगंज भागातील सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबीत करण्यात आले आहे. त्याच्यावर मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांसमोर अश्लील कृत्य केल्याचा आरोप. त्याच्या कथीत कृत्याचा एक व्हिडिओही शोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कथित व्हिडिओमध्ये, विश्वेश्वरगंज ब्लॉकमधील शिवपूर बैरागी प्राथमिक शाळेत पोस्ट केलेले दुर्गा प्रसाद जैस्वाल, शाळेत नग्न अवस्थेत मद्यधुंद अवस्थेत झोपलेले आढळून आला. या वेळी विद्यार्थी आगतीक होऊन लज्जेने इतकेतिकडे पाहात होते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)