उत्तर प्रदेश: जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक; हत्यारांसह, काडतुसे जप्त
Images of the two suspected JeM terrorists | (Photo Credits: Twitter/@ANI)

पुलवामा हल्ल्यानंतर देशात ठिकठिकाणाहून दहशतवादी कुरापती समोर येत आहेत. आता उत्तर प्रदेशात ATS ने कारवाई करत काही संशयितांना अटक केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्ती जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असू शकतात. शाहनवाज अहमद तेली (Shahnawaz Ahmad Teli) आणि आकिब (Aqib) अशी या दोघांची नावे आहे. हे दोघेही काश्मीरचे रहिवासी आहेत. यापैकी शाहनवाज कुलगाम तर आकिब पुलवामाचा रहिवासी आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती उत्तर प्रदेशातील डिजीपी ओ.पी. सिंग यांनी दिली. मुंबई लोकलवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; मुंबईसह महाराष्ट्रात अतिदक्षतेचा इशारा

डिजीपी ओ.पी. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, "शाहनवाज अहमद तेली याचे प्रमुख काम दहशतवादी तयार करुन त्यांची भरती करणे हे आहे. याला ग्रेनेडची चांगली माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहनवाज तेली याने उत्तर प्रदेशात आपल्या कामाला सुरुवात केली आहे."

गेल्या वर्षी National Investigation Agency च्या टीमने दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील 16 ठिकाणी छापे घातले होते. या छापेमारीत दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या (आयएस)  एका नव्या मॉड्युल 'हरकत-उल-हर्ब-ए-इस्लाम' चा पर्दाफाश केला होता. यावेळी 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.