Union Health Minister Dr. Harsh Vardhan | (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाखाली सध्या संपूर्ण भारत देश आहे. त्यामुळे कोविड 19 संकटाचा सामना करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. कोरोना रुग्णांवर नव्या उपचारपद्धतीचा अवलंब करण्यासह त्यांच्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. तसंच कन्टेंमेंट भागातील नागरिकांसाठी विशेष आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत. विशेष म्हणजे देशभरातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन (Union Health Minister Harsh Vardhan) यांनी महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरातील नागरिकांना विविध माध्यमातून सतर्क केले जात आहे. घरीच सुरक्षित राहण्याचा सल्ला वारंवार देण्यात येत आहे. तसंच मास्कचा वापर करणे बंधनकारक केले असून वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेण्यास सांगितले जात आहे. विशेष म्हणजे भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात कोरोनाचा संसर्ग टाळणे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्गला आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध ठरवण्यात आला आहे. (COVID-19 मुळे सर्वात वाईट परिस्थिती जरी उद्भवली तरी भारत सरकार सज्ज आहे- केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन)

PTI Tweet:

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत भारतात 3,967 नव्या रुग्णांची भर पडली असून 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 81,970 वर पोहचली असून एकूण 2,649 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान देशातील रिकव्हरी रेट चांगला आहे. तरी देखील गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी देश सज्ज असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी काही दिवासांपूर्वी दिली होती.