'अबकी बार करोडो बेरोजगार', काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल

सत्ताधारी आणि विरोधक यांचे काही ना काही मुद्द्यांवरून एकमेकांवर टिका करण्याचे काम सुरुच आहे. यात मोदी सरकार (Modi Government) आणि काँग्रेस पक्ष यांच्यात देखील टिकास्त्र युद्ध सुरुच असते. दरम्यान पुन्हा एकदा ट्विटद्वारे राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. 'अब की बार करोडो बेरोजगार' असे ट्विट करत केंद्र सरकारच्या 'अब की बार मोदी सरकार' या वाक्याची खिल्ली उडवली आहे. थोडक्यात या ट्विटवरुन त्यांना मोदी सरकारच्या काळात देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असल्याचे जनतेसमोर आणायचे आहे.

#अबकी_बार_करोड़ों_बेरोजगार, कौन ज़िम्मेदार? सिर्फ़ और सिर्फ़ मोदी सरकार! असे हॅशटॅग वापरत राहुल गांधींनी हे ट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट केल्यानंतर कमेंट्स बॉक्समध्ये काँग्रेस आणि भाजपा पक्षातील कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.हेदेखील वाचा- CBSE Board 12th Exam Cancelled: सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द, मोदी सरकारचा मोठा निर्णय

देशात मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी प्रचंड वाढली असून याला फक्त आणि फक्त मोदी सरकारच जबाबदार आहे असे राहुल गांधींना आपल्या ट्विटमधून सांगायचे आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांच्या विधानाची दखल घेत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. 'एक तर महामारी त्यात प्रधानमंत्री अहंकारी’,असं ट्विट केलं होतं.

दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने कोरोना महामारी रोखण्यासाठी रणनीती तयार केली आहे. त्यावर राहुल गांधी यांनी सातत्याने प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. या पूर्वीही त्यांनी पीएम केअर्स फंड आणि पीएम मोदी खोटारडे असून काम करण्यात अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. येणाऱ्या काळात लहान मुलांना सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता असेल. अशावेळी पेडियाट्रिक सर्व्हिसेस आणि व्हॅक्सिन ट्रिटमेंट प्रोटोकॉल आधीच तयार करावा लागेल. मोदी सिस्टिमला झोपेतून उठावं लागणार आहे. ही भविष्यातील गरज आहे, असं राहुल म्हणाले होते.