मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता राज्य करण्याची नैतिक जबाबदारी गमावली, केंद्रीय नेते रविशंकर प्रसाद यांची टीका
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद ( Photo Credit: ANI )

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी असे म्हटले आहे की, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी नव्हे तर शरद पवार यांना विचारुन घेतला आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे अद्याप गप्प का? त्यांनी असे ही म्हटले की, या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करु शकत नाही यासाठीच आता सीबीआय कडून केला जाणार आहे. ऐवढेच नाही तर उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नैतिकता आहे की नाही? असा सवाल सुद्धा रविशंकर प्रसाद यांनी उपस्थितीत केला आहे. कारण अनिल देशमुख यांनी त्यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या आधारावर दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा उपस्थितीत केले जाणार.

रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, अनिल देशमुख यांच्या पदावर राहुन सुद्धा मुंबई पोलीस तपास करु शकत नाही. मात्री आम्ही सुरुवातीपासूनच संपूर्ण तपासाची मागणी करत होतो. प्रत्येकजण अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत होते परंतु त्यांनी तो दिला नव्हता. पण आज तर कमालच झाली की त्यांनी शरद पवार यांची परवानगी घेतली आणि राजीनामा दिला. त्यांनी असा प्रश्न उपस्थितीत केला की, उद्धव ठाकरे आता कधी बोलणार? त्यांचे मौनच हे खुप काही गोष्टींचा इशारा देतात. पुढे रविशंकर प्रसाद यांनी असे ही म्हटले की, हे संपूर्ण प्रकरण समोर येईल कारण एनआयए यांच्या तपासात सर्वकाही पुढे येत आहे.(Anil Deshmukh यांनी दिला महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा;CBI चौकशीच्या आदेशानंतर नैतिकदृष्ट्या पदापासून दूर जाण्याचा निर्णय)

Tweet:

रविशंकर प्रसाद यांनी असे ही म्हटले की, आम्हाला असे वाटते की या प्रकरणाचा संपूर्ण तपास व्हावा. ही महाआघाडी नव्हे तर वसूली आघाडी आहे. अनिल देशमुख यांनी राजीनाम्यात नैतिकतेच्या आधारावर तो देत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे जी तुमची सुद्धा कोणती नैतिकता नाही  आणि जर देशमुख नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देतायत तर तुमची कुठे गेली असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी उपस्थितीत केला आहे.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर वसूलीचे आरोप लावल्यानंतर महाराष्ट्रातील राजकरण तापल्याचे दिसून आले होते. या प्रकरणी जयश्री पटेल यांच्या याचिकेवर आज बॉम्बे हायकोर्टाने सुनावणी केली. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला.