Jammu-Kashmir मधील दोन संशयित दहशतवाद्यांना दिल्लीत अटक; 10 जिवंत काडतूसांसह 2 अर्ध-स्वयंचलित पिस्तूल जप्त
Arrested (Photo Credits: Facebook)

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) सराई काळे खां परिसरातून दो संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दोघेही जम्मू-काश्मीरचे (Jammu-Kashmir) रहिवासी आहेत. सोमवारी (16 नोव्हेंबर) रात्री पोलिसांनी दोघांनाही अटक केली. स्पेशल सेलचे पोलिस उपायुक्त संजीव यादव यांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सराई काळे खां येथील मिलेनियम पार्कजवळ सापळा रचला आणि दोन संशयित दहशतवाद्यांना पकडले.

अब्दुल लतीफ (22) आणि अशरफ खताना (20) अशी या दोघांची नावे आहेत. त्यापैकी अब्दुल बारामूला आणि अशरफ कुपवाडाचा रहिवासी आहे. या दोघांकडून 10 जिवंत काडतूसांसह दोन अर्ध-स्वयंचलित पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा घातपात टळला. प्राप्त माहितीनुसार, सोशल मीडियामार्फत हे दोघेही एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आले होते. अनेकदा त्यांचा पाकिस्तानला जाण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान, पोलिसांना या दोघांबाबत माहिती मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचत दोघांनाही अटक केली. (Jammu Kashmir: जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्तान चा झेंडा फडकवणार्‍या तिघांंना अटक, एक हॅण्ड ग्रेनेड सुद्धा जप्त)

ANI Tweet:

या प्रकरणी अधिक तपासणी सुरु असून या संबंधित अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची निवडणुका प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.