भारतीय हवामान विभागाने (IMD) आज आणि उद्यासाठी ( 8 आणि 9 ऑगस्ट 2024) राजधानी दिल्ली आणि इतर राज्यांसाठी हवामान अंदाज (Weather Forecast) व्यक्त केला आहे. त्यानुसार दिल्लीत आज हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह आकाश ढगाळ पाहायाल मिळेल. तसेच सलग दोन्ही दिवशीही दिल्ली NCR प्रदेशात अतिवृष्टीची शक्यता नाही. दरम्यान, उद्याचे हवामान (Tomorrow's Weather Forecast) विचारात घेता महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षीत आहे. तर उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये दमदार पाऊस पाहायला मिळू शकतो. त्यामुळे या राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आहे.
दिल्लीसाठी यलो अलर्ट: IMD ने नोएडासह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात या ठिकणी किमान आणि कमाल तापमान 25 आणि 33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असे आयएमडीने म्हटले आहे. उद्याचे हवामानही असेच राहण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Hare Care Tips For Monsoon: पावसाळ्यात कशी घ्यावी केसांची काळजी? जाणून घ्या खास टिप्स)
तापमान श्रेणी: ही तापमान श्रेणी पुढील पाच दिवसांपर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे.
देशभरातील राज्यांमधील हवामान अंदाज:
ऑरेंज अलर्ट: उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशसह अनेक राज्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुसळधार पावसाची शक्यता:
हिमाचल प्रदेश: 8 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
उत्तराखंड: 10 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज, शक्यतो 13 ऑगस्टपर्यंत वाढेल.
उत्तर प्रदेश: 11 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता.
पंजाब: 10 ऑगस्टला पाऊस अपेक्षित आहे.
हरियाणा: 8 आणि 10 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज.
पश्चिम आणि मध्य भारत: 14 ऑगस्टपर्यंत कोकण, गोवा, गुजरात प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. (हेही वाचा, Monsoon Health Tips for Kids: पावसाळ्यात मुले निरोगी राहतील, 'घ्या' अशी काळजी)
दक्षिण द्वीपकल्पीय भारत:
कर्नाटक: 8 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज.
तेलंगणा: पुढील तीन दिवसांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे, उत्तर तेलंगणासाठी यलो अलर्ट आणि पूर्व तेलंगणात संभाव्य पाऊस.
पूर्व आणि ईशान्य भारत हवामान:
पावसाचा अंदाज: आठवडाभर ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
आसाम आणि मेघालय: 8 आणि 9 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम: 8 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
अरुणाचल प्रदेश आणि बिहार: 9 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज.
भारतातील भौगोलीक परिस्थिती आणि निसर्गातील बदल, तापमान आणि ऋतंमध्ये दैनंदिन होणारे बदल, जगभरातील वातावरणामध्ये होणाऱ्या घडामोडी यांचा संबंध लावून तसेच उपग्रहांद्वारे आलेल्या माहितीचा अन्वयार्थ लावून आयएमडी हवामान अंदाज वेळोवेळी व्यक्त करत असते.