टाईम मासिकाने भविष्याला आकार देणाऱ्या 100 उदयोन्मुख नेत्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये एक भारतीय कार्यकर्ता आणि भारतीय वंशाच्या पाच व्यक्तींना स्थान मिळाले आहे. यामध्ये ट्विटरचे मुख्य वकील विजया गड्डे आणि ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा समावेश आहे. तसेच भीमा आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचादेखील या यादीत समावेश आहे. '2021 टाइम 100 नेक्स्ट' (The 2021 TIME100 Next) यादी बुधवारी जाहीर झाली. ही यादी जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या टाईम 100 सिरीजचा विस्तार आहे.
या यादीमध्ये स्थान मिळालेल्या इतर भारतीयांमध्ये इंस्टाकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता, डॉक्टर आणि Get Us PPE च्या शिखा गुप्ता, Upsolve चे रोहन पावुलुरी यांचा समावेश आहे. टाईम 100 चे संपादकीय दिग्दर्शक डॅन मॅकसाई म्हणाले, ‘या यादीतील प्रत्येकजण इतिहास घडविण्यासाठी तयार आहे. खरे तर अनेकांनी आधीच असा इतिहास घडवाला आहे.’ ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्याबद्दल मासिकाने लिहिले की, त्यांना अर्थमंत्री बनवताच कोरोना साथीच्या काळात ते सरकारचा प्रमुख चेहरा बनले. युवगोव्हच्या सर्वेक्षणानुसार सुनक हे देशातील सर्वात लोकप्रिय राजकारणी आहे आणि ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान म्हणून ते ओडिसीमक यांची पसंती आहेत.
इंस्टाकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता यांच्याबाबत मासिकाने म्हटले आहे की, कोरोना साथीच्या सुरुवातीच्या दिवसात यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्या, कारण लोक सेवा देणार्या कर्मचार्यांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नधन्य खरेदी करत होते. टाईम मासिकाने ट्विटरच्या वकील विज गड्डे यांना कंपनीच्या शक्तिशाली अधिकारी म्हणून संबोधले आहे. कॅपिटल हिलमध्ये 6 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट निलंबित केले गेले असल्याची माहिती त्यांनीच सीईओ जॅक डोर्सी यांना दिली होती. (हेही वाचा: भारतामधील ग्रामीण आणि शहरी भागातील 50% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा नाही; सर्वेक्षणामधून समोर आली धक्कादायक माहिती)
भीम आर्मीचे नेते आझाद (34) यांच्याबद्दल मासिकामध्ये म्हटले आहे की, दलित समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी ते शाळा चालवतात आणि ते आक्रमक आहेत. जाती-आधारित हिंसाचाराच्या बळींच्या बचावासाठी ते बाइकवरून खेड्यांचा दौरा करतात. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी आझाद आणि भीम आर्मीने मोहीम सुरू केली होती.