शौचालयात बसवले चक्क अशोकचक्र आणि महात्मा गांधींच्या फोटोंच्या टाईल्स
Mahatma Gandhi & Ashok Chakra Tiles (Photo Credits: ANI)

देशातील दिग्गज नेत्यांचा वेगवेगळ्या प्रकारातून, भाषेतून अपमान करणे ही गोष्ट काही नवीन नाही. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव काही समाजकंटकांमुळे अशा नेत्यांची विटंबना होतच असते. मात्र आता यात भर म्हणून एक धक्कादायक घटना बुलंदशहरातील(Bulandshahr) इच्छावरी (Ichhawari)  गावात घडली आहे. या गावात सरकारच्या 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयांमध्ये चक्क अशोकचक्र (Ashoka Chakra)  आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या  (Mahatma Gandhi) फोटोंच्या टाईल्स बसविण्यात आल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस स्थानकात तक्रारही नोंदविण्यात आली आहे.

मुळात या गावात सरपंचाने शौचालय बनवून घेतले आहे. मात्र जेव्हा या शौचालयातील टाईल्सवर महात्मा गांधी आणि अशोकचक्राचा फोटो बघितला तेव्हा गावक-यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित पोलीस स्थानकात तक्रार केली.

पुणे: पाकिस्तानी झेंड्यावर लायटर फ्री; घरात घुसून धडा शिकवा, लोक व्यक्त करतायत संताप

तसेच या गावातील 15 ते 20 शौचालयात असे टाईल्स बसविण्यात आल्याचे येथील गावक-यांचे म्हणणे आहे. याचे तीव्र पडसाद उमटताच या टाईल्स संबंधितांकडून काढण्यात आल्या आहेत. तसेच अशा टाईल्स का बसवल्या, याबाबत अधिक तपास सुरू आहे.