31 डिसेंबर आधी करा ही '4' महत्त्वाची कामे अन्यथा भरावा लागेल मोठा भुर्दंड
ATM Debit Cards | (Archived, edited, representative images)

नवीन वर्ष अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेले असताना 2019 वर्षामधील राहिलेली महत्त्वाची कामे लवकरात लवकर उरकून घेण्याच्या मागे प्रत्येक माणूस लागलेला पाहायला मिळेल. 2019 हे वर्ष राजकारणासह बरेच आर्थिक उलाढालीचे होते. यात अनेक बदल झालेले पाहायला मिळाले. मग ते आधारकार्ड असो, वाहतुकीचे नियम असो वा वाहन परवाना असो. अनेक आधुनिक बदलही 2019 मध्ये पाहायला मिळाले. त्याच पार्श्वभूमीवर नव्या वर्षात काही नवे नियम लागू होणार आहेत. तर नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार असल्यानं त्यासंदर्भातील माहिती तुम्ही घेणं आवश्यक आहे. अन्यथा तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. ही सर्व कामे तुम्हाला 31 डिसेंबर पूर्वी आटपून घ्यायची आहेत.

नवीन वर्षाची सुरुवात वाईट होऊ नये वा तुम्हाला कोणताही आर्थिक भुर्दंड भरावा लागू नये यासाठी 31 डिसेंबरपूर्वी तुम्ही ही 10 कामे अवश्य करा.

1) जुने डेबिट-क्रेडिट कार्ड बदला

31 डिसेंबर 2019 पर्यंत तुमचे जुने डेबिट आणि क्रेडिट कार्ड त्वरित बदला अन्यथा तुमचे कार्ड ब्लॉक होण्याची शक्यता आहे. मॅग्नेटिक स्ट्राईप असलेले जुने कार्ड बदलून चिप असलेले कार्ड घ्या जेणेकरुन तुमचा सर्व तपशील सुरक्षित राहील.

2) ITR फाईल केला नाही तर भरावा लागेल दुप्पट दंड

तुम्ही 31 डिसेंबरआधी इन्कमटॅक्स रिटर्न भरला नाहीत तर तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. 31 डिसेंबर पर्यंत आयटीआर भरला तर 5000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. नव्या वर्षात हा दंड जवळपास दुप्पट होणार असल्यानं 31 डिसेंबर आधीच आयटीआर भरून घ्या. शिर्डी साईबाबा मंदिर 31 डिसेंबर ला रात्रभर दर्शनासाठी राहणार खुले

3) पॅन-आधार लिंक न केल्यास पॅनकार्ड ठरेल अवैध

तुम्ही पॅनकार्ड आधारकार्डला लिंक केलं नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. या महिन्या अखेरपर्यंत पॅन आधारसोबत लिंक करणं बंधनकारक आहे. यासाठी इनकम टॅक्स विभागाने 31 डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. वारंवार इनकम टॅक्स विभाकडून याबाबत मुदत वाढ देण्य़ात आली होती.

4) सबका विश्वास योजनेचा घेता येणार नाही लाभ

तुम्ही जर कोणत्या सेवा किंवा अबकारी कराच्या वादात अडकला असलात तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही या वादात अडकला असाल अथवा अडकण्याची शक्यता असेल तर 31 डिसेंबरआधी तुम्ही मोदी सरकारने सुरु केलेल्या सबका विश्वास योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी केवळ 7 दिवसांचा अवधी तुमच्याकडे असणार आहे. कारण ही योजना सरकारनं नव्या वर्षात म्हणजेच 31 डिसेंबरनंतर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

31 डिसेंबर आधी करा ही '4' महत्त्वाची कामे अन्यथा भरावा लागेल मोठा भुर्दंड Watch Video 

ही सर्व महत्त्वाची कामे तुम्हाला 31 डिसेंबरपूर्वीच उरकून घ्यायची आहेत. तसे न केल्यास नवीन वर्षात तुमच्या खिशाला चाप बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.