City | Pixabay.com

कर्नाटकातील बंगळूर हे अनिवासी भारतीयांची (NRI) पहिली पसंती बनले आहे. प्रोपटेक युनिकॉर्न नोब्रोकरच्या अलीकडील सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. भारतात मालमत्ता खरेदी करू पाहणाऱ्या अनिवासी भारतीयांना (NRI) बंगळूरमध्ये (Bengaluru) मालमत्ता खरेदी करायची आहे. हे सर्वेक्षण 12,000 अनिवासी भारतीयांवर करण्यात आले. (हेही वाचा - PAN-Aadhaar linking न झाल्याने देशात 11.5 पॅन कार्ड्स डिअ‍ॅक्टिव्हेट; तुमचं आधार-पॅन लिंक आहे का? असं तपासा!)

12,000 अनिवासी भारतीयांपैकी 45 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना भारतात मालमत्ता खरेदी करायची आहे. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की भारतातील सहा शहरांपैकी दिल्ली एनसीआर, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि पुणे यापैकी त्यांना मालमत्ता कोणत्या ठिकाणी खरेदी करायची आहे? तर, या अनिवासी भारतीयांपैकी 29 टक्के लोकांनी बंगळूरमध्ये मालमत्ता खरेदी करण्यात रस दाखवला, तर 24 टक्के लोकांनी मुंबईत आणि 18 टक्के हैदराबादमध्ये मालमत्ता करण्यास पसंती दर्शवली.

भारतात मालमत्ता खरेदी करू पाहणारे बहुसंख्य अनिवासी भारतीय हे UAE आणि US मधील आहेत आणि त्यापैकी 37 टक्के IT/तंत्रज्ञान व्यावसायिक म्हणून काम करतात.  अलिकडच्या वर्षांत भारतातील रिअल इस्टेटमधील अनिवासी भारतीयांच्या इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भाडेवाढ, भारतीय रुपयाची सतत घसरण, अनुकूल सरकारी धोरणे आणि प्रतिकूल परिस्थितीत रिअल इस्टेट क्षेत्राची लवचिकता यासारख्या कारणांमुळे हे घडले आहे.