मात न तू वैरी: अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या 9 महिन्यांचा मुलाला आईने विकले; अडीच लाखाला पार पडला सौदा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Pixabay)

प्रेमात लोक आंधळे होतात असे आपण म्हणतो. मात्र एका कलियुगी आईने प्रेम संबंधात (Extra Marital Affairs) बाधा येत असलेल्या, आपल्या 9 महिन्याच्या मुलाला चक्क विकून टाकले आहे. ही घटना शहाबाद पोलिस स्टेशन परिसरातील आहे. यामध्ये मुलाच्या अपहरणांविषयी तक्रार केली होती, त्यानंतर आरोपीला अटक झाल्यानंतर मुलाची विक्री झाली असल्याची गोष्ट समोर आली. मुलाला विकाल्यानंतर आई व तिचा प्रियकर गुजरातला पळून गेले. मात्र काही दिवसानंतर या प्रियकरानेही महिलेची साथ सोडली होती.

26 सप्टेंबर रोजी, आलमने आपली बहिण चमन फिरोज व तिचा नऊ महिन्यांचा मुलगा फैज, यांचे अपहरण केल्याबद्दल विपिन याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. शुक्रवारी पोलिसांनी विपिनला बिलारी रोड येथून अटक केली. त्यानंतर चौकशीत धक्कादायक खुलासा झाला. विपिनने चमनसोबत त्याचे अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना सांगितले. चमनचा 9 महिन्यांचा मुलगा या नात्यात अडथळा आणत होता. म्हणून त्यांनी योजना तयार केली आणि 26 सप्टेंबरला बदायूंला गेले. तिथे त्यांनी या मुलाला हरियानाचे राहुल पुत्र दीवानचंद यांना विकले. हा सौदा अडीच लाखाला पार पडला.

(हेही वाचा: सातारा: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या मुलाची प्रियकराच्या मदतीने आईनेच केली हत्या)

मुलाची विक्री केल्यानंतर दोघे गुजरातमधील चिकली येथे गेले आणि तेथेच स्थायिक झाले. त्यानंतर जेव्हा पैसे संपले तेव्हा राहुलकडे अजून एक लाख रुपयांची मागणी केली. हेच पैसे आणायला विपिन घराबाहेर पडला, मात्र तो परत आला नाही. त्यानंतर चमन घरी परतली व तिने विपिन विरोधात तक्रार दाखल केली. या अपहरण प्रकरणात पोलिसांनी विपिनला अटक केली असता, संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. चमनने या मुलाला ज्या कुटुंबाला विकले होते, त्यांच्या चार कुटुंबात मुले नाहीत. मुलाची खरेदी करताना कुटुंबाने संपूर्ण व्हिडिओ बनविला होता, यामुळे पोलिसांच्या कारवाईत चमनचा खरा चेहरा पोलिसांसमोर उघडकीस आला.