जम्मू-काश्मीर: त्राल येथील चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश
Representational Image (Photo Credit: ANI)

जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) मधील पुलवामा (Pulwama) येथील त्राल (Tral) परिसरात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे काही हत्यारे सापडली आहेत. दहशतवादी लपून बसल्याने जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरु आहे. रफीक वानी ( Jangeer Rafiq Wani), राजा उमर मकबूल भट (Raja Umar Maqbool Bhat) आणि उजैर अमिन भट (Uzair Amin Bhat)अशी या जवानांची नावे आहेत. अंसार गजवा उल हिंद (Ansar Ghazwa ul Hind) या संघटनेशी हे दहशतवादी संलग्न होते. या जॉईंट ऑपरेशनमध्ये भारतीय सेना, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिस देखील सहभागी होते. (Jammu & Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; 2 जवानांसह 4 जण जखमी)

त्राल येथे दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती जवानांना गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली होती. त्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. त्याच दरम्यान दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना करण्यात आलेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.

ANI ट्विट:

जम्मू काश्मीर येथून कलम 370 हटवल्यानंतर दहशतवाद्यांचा रोष अधिकच वाढला आहे. मोठा हल्ला करण्यात दहशतवादी संघटनांचे मनसुबे आहेत. मात्र भारतीय जवानांकडून त्यांच्या कटावर पाणी फिरवले जात आहे. दहशवादी संघटनाच्या कुरापतीला भारतीय जवानांकडून चोख उत्तर दिले जात आहे. गेल्या महिन्यात त्राल येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले होते. तर दोन जवान जखमी झाले होते.