Coronavirus च्या सर्व टेस्ट मोफत देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
Supreme Court of India | File Image | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी कोविड-19 संबंधीचे सर्व टेस्ट मोफत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यासंदर्भात केंद्र तसेच राज्य सरकार निर्देश जारी करेल, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. देशातील नागरिकांची मोफत कोरोना चाचणी करण्यात यावी, यासाठी वकील शशांक देव सुधी यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याबाबत आज सर्वोच न्यायालयाने निकाल दिला आहे. हा खूप चांगला निर्णय असून सर्व स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

कोरोना ची लक्षणं दिसणा-या संशयित रुग्णाची लवकरात लवकर चाचणी व्हावी जेणेकरुन हा आजार फैलावणार नाही यासाठी कोरोना टेस्ट मोफत करण्यात यावी म्हणून वकिल शशांक देव सुधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने यास मंजूरी दिली आहे.

(2521717)Supreme Court issued following interim directions to Centre: Tests relating to COVID19 whether in approved govt laboratories or approved private labs shall be free of cost,the Apex Court said and that Centre shall issue necessary directions in this regard immediately (1/3) pic.twitter.com/p7MPMEomzk

हेदेखील वाचा- Coronavirus: कोरोना व्हायरस बाधितांची देशातील संख्या 5194 वर पोहोचली, 401 जणांना डिस्चार्ज, 149 मृत्यू

त्यानुसार, खाजगी आणि सरकारी प्रयोगशाळांमध्ये तसेच WHO वा ICMR प्रमाणित वैद्यकिय संस्थांमध्ये ही टेस्ट मोफत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची भारतातील संख्या मोठ्या वेगाने वाढताना पाहायला मिळत आहे. ताज्या आकडेवारीनुसार 773 नव्या रुग्णांसह देशातील COVID-19 बाधितांची संख्या तब्बल 5194 वर पोहोचली आहे. त्यातील 401 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, आतापर्यंत कोरोना बाधित तब्बल 149 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस बाधितांची एकूण संख्या 4643 इतकी आहे.