कश्मीर मधील फूटीरतावादी नेता यासिन मलिक (Yasin Malik) याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली कोर्टाने दोषी ठरवलं आहे. NIA कोर्टाने आज हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यासिनला आज दोषी ठरवल्यानंतर आता 25 मे दिवशी कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. यासिक मलिकचा कश्मीर मध्ये अनेक दहशतवाद कारवायांमध्ये सहभाग होता आणि त्याने याची कबुली देखील दिली आहे.
यासिन मलिक हा जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंट अर्थात JKLF शी निगडीत आहे. 2019 साली भारताच्या केंद्र सरकार कडून JKLF वर निर्बंध घालण्यात आले होते. सध्या यासिन मलिक तिहार जेल मध्ये कैद आहे. यासिनवर 1990 साली एअरफोर्सच्या 4 जवानांची हत्या केल्याचा आरोप आहे. याला त्याने स्वीकारले आहे. 2017 साली कश्मीर मध्ये आतंकवाद आणि फूटीरतावादी कारवाया करण्यासारखे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. नक्की वाचा: J&K Terror Funding Case: NIA न्यायालयाचा आदेश, दहशतवादी हाफिज सईद आणि सय्यद सलाहुद्दीन यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल.
ANI Tweet
The court also sought an affidavit from Yasin Malik regarding his financial assessment and asked NIA to submit a report related to his financial assessment. Argument on sentence to take place on the next date of hearing, on 25th May.
— ANI (@ANI) May 19, 2022
यासीन मलिकच्या गुन्ह्यांची यादी खूप मोठी आहे. यासीन ने न्यायालयात सांगितले होते की तो कलम 16 (दहशतवादी कारवाया), 17 (दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे), 18 (दहशतवादी कृत्ये करण्याचा कट) आणि 20 (दहशतवादी गट किंवा संघटनेचा) दोषी आहे. UAPA चे सदस्य असल्याने) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 120-B (गुन्हेगारी कट) आणि 124-A (देशद्रोह) अंतर्गत त्याच्यावरील आरोपांना आव्हान देऊ इच्छित नाही.