Tamil Nadu Shocker: जीवंत असल्याचे सांगत महिलेने घरातच ठेवला आईचा मृतदेह
Crime Scene | Representational Image | (Photo Credits: PTI)

Tamil Nadu Shocker:  तमिळनाडू येथे एका 75 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह तिच्या मुलींनी घरीच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिच्या दोन मुलींनी असे म्हटले की, त्यांची आई जिवंत असल्याने तिला घरातच ठेवले आहे. ही घटना तमिळनाडू येथील सोकमपट्टी येथे शनिवारी घडली आहे. बी मेरी असे महिलेचे नाव असून त्या शाळेतील निवृत्त शिक्षिका होत्या, त्यांच्या घरी जेव्हा पोलीस आले तेव्हा त्यांची मुलगी बी जयंती आणि बी जॉन्सिथा यांनी त्यांच्या आईला घेऊन जाण्यास नकार दिला. त्यांनी म्हटले की, आम्ही तिच्या पुर्नजन्मासाठी प्रार्थना करत आहोत.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन करत मेरी यांच्या घरातून उग्र वास येत असल्याचे सांगितले. जेव्हा पोलिसांनी मेरी यांच्या घराचा दरवाजा ठोठावला तेव्हा जयंती आणि जॉन्सिथा यांनी पोलिसांना आतमध्ये येण्यासाठी नकार दिला. यावर पोलिसांनी म्हटले की, दरवाजा उघडला नाही तर तो तोडला जाईल. अखेर त्या दोघींनी दरवाजा उघडत पोलिसांना आतमध्ये घेतले.(Bihar Murder Case: बिहारमध्ये जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी, हल्ल्यात पती-पत्नीचा मृत्यू)

पोलिसांना मेरी यांचा सडलेला मृतदेह घरात मिळाला. परंतु तिचा मृतदेह एका जीवंत व्यक्तीसारखा ठेवण्यात आला होता. परंतु त्या दोघींना भीती वाटत होती की, आम्ही जर आतमध्ये गेलो तर ती दुखावेल असे पोलिसांनी म्हटले. अखेर त्यांना तिचा मृतदेह घरात सापडला. पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्याची माहिती दिली आहे.

काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या दोघींनी आईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तयार केले. मृतदेह सरकारी रुग्णालयात आणले तरीही त्या दोघींनी त्यांची आई जीवंत असल्याचे सांगत वाद घातला. शवविच्छेदन केल्यानंतर सुद्धा त्या भांडत असल्याचे पोलिसांनी म्हटले. अखेर त्यांनी शनिवारी मृतदेहावर अंतिम संस्कार केले.