तामिळनाडू (Tamil Nadu) येथील कोयंबटूर (Coimbatore) येथून एक भयंकर घटना समोर आली आहे. कोयंबटूर येथील थनीरपंडाल रोड (Thaneerpandal Road) जवळील एका एटीएम (ATM) मधून एक साप सापडला. त्यानंतर सर्पमित्राच्या मदतीने सापाला एटीएम बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
या सापाला एटीएम बाहेर काढण्यासाठी व्यक्तीला थोडी अधिक मेहनत करावी लागली. काही वेळात साप सर्पमित्राच्या दृष्टीस पडला आणि त्याने सापाची शेपटी पकडून त्याला बाहेर काढले.
पहा व्हिडिओ:
#WATCH Tamil Nadu: A Snake found inside an ATM near Thaneerpandal Road in Coimbatore; later rescued by a snake catcher. ( 23.04.2019) pic.twitter.com/Yk6YSOIQVn
— ANI (@ANI) April 24, 2019
एटीएम मधील या सापाला कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
काल (23 एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना कन्नूर येथील मतदान केंद्रात व्हीव्हीपॅट मशीनमधून साप निघाला. मतदान करताना एका व्यक्तीला तो साप दिसला. त्यानंतर मतदार केंद्रात उपस्थित सर्वांची घाबरगुंडी उडाली. तात्पुरते मतदानही स्थगित झाले. त्यानंतर लवकरच त्याला मशीन बाहेर काढण्यात आले आणि मतदानाला पुन्हा सुरुवात करण्यात आली.