
Tahawwur Rana Aarrested by NIA: 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा (Tahawwur Rana) याला गुरुवारी भारतात प्रत्यार्पण (Extradition) केल्यानंतर अटक (Arrest) करण्यात आली. राणाला न्यायालयात हजर करण्यापूर्वी वरिष्ठ वकील दयान कृष्णन आणि एनआयएचे विशेष सरकारी वकील, वकील नरेंद्र मान हे राष्ट्रीय राजधानीतील पटियाला हाऊस न्यायालयात (Patiala House Court) पोहोचले. तहव्वुर राणाला पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) म्हटले आहे की, 2008 च्या दंगलीमागील प्रमुख सूत्रधाराला न्यायाच्या चौकटीत आणण्यासाठी वर्षानुवर्षे केलेल्या सततच्या आणि एकत्रित प्रयत्नांनंतर राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.
एनआयएच्या म्हणण्यानुसार, भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारांतर्गत प्रत्यार्पणासाठी सुरू केलेल्या कार्यवाहीनुसार राणाला अमेरिकेत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. राणाने हा निर्णय रोखण्यासाठी सर्व कायदेशीर मार्ग वापरल्यानंतर अखेर त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले. गुरुवारी एका विशेष विमानाने राणाला भारतात आणण्यात आले. (हेही वाचा - 26/11 Mumbai Attacks: भारताला मोठे यश! मुंबईमधील 26/11 हल्ल्यातील आरोपी Tahawwur Rana च्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या न्यायालयाने दिली मंजुरी)
NIA Secures Successful Extradition of 26/11 Mumbai Terror Attack Mastermind Tahawwur Rana from US pic.twitter.com/sFaiztiodl
— NIA India (@NIA_India) April 10, 2025
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, तहव्वुर राणा भारतात पोहोचल्यावर त्याला तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. तुरुंगात सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे. 64 वर्षीय राणा हा पाकिस्तानात जन्मलेला कॅनेडियन नागरिक आहे. तसेच तो 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानी, जो अमेरिकन नागरिक आहे, त्याचा जवळचा सहकारी आहे.