Swiggy (Photo Credits: PTI)

रेल्वेमध्येही आता स्विगी (Swiggy) कडून फूड डिलेव्हरी खवय्यांना मिळणार आहे. नुकताच यासाठी IRCTC आणि Swiggy मध्ये करार झाला आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान तुमच्या आवडत्या रेस्टॉरंट मधील पदार्थांची तुम्ही बसल्या जागी चव चाखू शकणार आहात. स्विगी आणि आय आरसीटीसी मधील करारानुसार देशातील 63 स्थानकांवर ही सोय मिळणार आहे. त्यामध्ये बेंगलुरू, भुवनेश्वर, विशाखापट्टणम आणि विजयवाडा स्थानकामध्ये ही सएवा येत्या काही आठवड्यात सुरू होणार आहे. प्री-ऑर्डर केलेल्या जेवणाची डिलिव्हरी IRCTC च्या ई-कॅटरिंग पोर्टलद्वारे केली जाईल. 2023 मध्ये अशा प्रकारचा करार आयआरसीटीसी आणि झोमॅटो मध्ये झाला होता, त्यांच्यामध्ये नवी दिल्ली, प्रयागराज, कानपूर, लखनौ आणि वाराणसी यांचा समावेश होता.

स्विगी आणि झोमॅटोचे देशातील फूड डिलिव्हरी मार्केटवर वर्चस्व आहे, जे संपूर्ण व्यवसायात सुमारे 95 टक्के आहे. झोमॅटो फायदेशीर ठरत असताना, स्विगी तेथे जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. Medicine Found in Food: मुंबईतील व्यक्तीला Swiggy वरून ऑर्डर केलेल्या जेवणात सापडली औषधाची गोळी, पहा फोटोज .

पहा पोस्ट

 

स्विगी वरून फूड कसं कराल ऑर्डर?

  • IRCTC app वर तुमचा PNR टाका.
  • फूड डिलेव्हरी साठी तुमचं स्टेशन निवडा.
  • स्विगी वर उपलब्ध रेस्टारंटची लिस्ट पहा.
  • विशिष्ट लोकेशनवर आणि त्या वेळेत ज्या रेस्टोरंट मधून डिलेव्हरी होऊ शकते ते रेस्टॉरंट निवडा.
  • रेल्वे स्टेशन वर डिलेव्हरी घेऊन स्विगी कडून त्यांचा डिलेव्हरी बॉय विशिष्ट वेळ आधीच पोहचलेला असेल.
  • ग्राहकाला फूड पार्सल दिले जाईल आणि डिलेव्हरी झाल्याची नोंद ठेवली जाईल.

IRCTC भारतात केटरिंग, हॉस्पिटॅलिटी, पॅकेज्ड पिण्याचे पाणी, इंटरनेट तिकीट, प्रवास आणि पर्यटन सेवा पुरवते. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, IRCTC ने ₹1,005.88 कोटी निव्वळ नफ्यासह ₹3,541.47 कोटी कमाई केली आहे.