Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर तीन तास सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
Supreme Court | (File Image)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Death Case) प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज (11 ऑगस्ट) तीन तास सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व पक्षकारांचे युक्तीवाद ऐकून घेतले आणि त्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला. दरम्यान, येत्या गुरुवारपर्यंत (13 ऑगस्ट) सर्व पक्षकारांनी आपला संक्षीप्त अहवाल न्यायालयाकडे जमा करावा असेही आदेश दिले.

केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी सुनावणीवेळी न्यायालयात सांगितले की, CrPC 174 अन्वये सुरु असलेली दुर्घटनेतील मृत्यू प्रकरणाची चौकशी खूपच कमी कालावधीत चालते. मृताचे शरीर आणि घटनास्थळी जाऊन पाहणी केली जाते की मृत्यू संशयास्पद आहे किंवा नाही. त्यानंतर FIR दाखल होतो. मुंबई पोलीस या प्रकरणात जे करत आहेत ते योग्य नाही.

सुशांत सिंह याच्या वडीलांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, सुशांतला त्यांच्या कुटुंबापासून दूर केले जात होते. मी अनेकदा म्हटले होते की माझ्या मुलाच्या उपचारांबाबत काय सुरु आहे. मला तिकडे येऊ द्या. परंतू, कोणाकडूनही काहीही उत्तर आले आही. त्यामुळे या प्रकरणात अनेक मुद्द्यांचा तपास होणे आवश्यक आहे. गळ्यावर असलेल्या खुणा या बेल्टच्या होत्या. त्याचे शरीर पंख्याला लटकलेले कोणीही पाहिले नाही. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, प्रतिपक्ष प्रसारमाध्यमांच्या हवाल्याच्या आधारे बऱ्याच गोष्टी सांगत आहे. परंतू, मी असे काही करणार नाही. प्रसारमाध्यमं हेही सांगत आहेत की या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा समावेश आहे. मात्र, मला त्यावर काहीच म्हणायचे नाही.

वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी महाराष्ट्र सरकारची बाजू न्यायालयात मांडली. सिंघवी यांनी सांगितले की, देशामध्ये एक संघ प्रणालीचा साचा आहे. तक्रारदाराला सोईचे वाटले म्हणून तो कोठेही तक्रार दाखल करु शकतो का. या प्रकरणात व्यवस्थेबाहेरीलच लोक वकील आणि न्यायाधीश बनले आहेत. काही म्हतात हीआत्महत्या आहे. काही म्हणतात हत्या. या सगळ्यामध्ये या प्रकरणाचीच हत्या होत आहे. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण कितीही सनसनाटी बनवले तरीही न्यायायाला फरक पडत नाही. बिहार पोलिसांना चौकशीचा अधिकार नाही. तरीही या प्रकरणाचा तपास ते सीबीआयकडे सोपवतात. सर्वाच्च न्यायालय एका राज्यातून दुसऱ्या राज्याकडे एफआयआर हस्तांतरीत करु शकते. मात्र या प्रकरणात जे सुरु आहे ते अत्यंत बेकायदेशीर आहे. (हेही वाचा,Sushant Singh Rajput Death Case: अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सुशांत सिंह राजपूत याच्याबरोबर झालेल्या व्हॉट्सअप संवादाचे स्क्रीनशॉर्ट केले शेअर )

बिहार सरकारच्या वकीलांनी म्हटले की, मुंबई पोलीस 25 जून नंतरही जबाब गेत राहिले. या प्रकरणात एकमेव तक्रार पटना पोलिसांमध्ये दाखल झाली. असे वाटत आहे की मुंबई पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत. चौकशीसाठी गेलेल्या बिहार पोलिसांच्या पथकाला क्वारंटाईन करण्या आले. हा सगळा काय प्रकार आहे. जर सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये गायब होतात तर सुशांतच्या वडीलांना पाटना येथे एफआयआर दाखल करण्याचा हक्क आहे. मुंबई पोलिसांनी केवळ प्रसारमाध्यमांना दाखवण्यासाठी दिखावा केला. प्रत्यक्षात कोणताही चौकशी केली नाही. 25 जून नंतर मुंबईत कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित नाही.

शाम दीवान यांनी रिया चक्रवर्ती हिची बाजू न्यायालयात मांडली. या वेळ न्यायालयाने विचारले की, तुम्हाला या प्रकरणाची चौकशी सीबीआय द्वारे करवी असे वाटते का यावर त्यांनी हो आम्ही निष्पक्ष चौकशी व्हावी असे इच्छितो असे त्यांनी सांगितले. मात्र, हे प्रकरण ज्या पद्धतीने सीबीआयकडे सोपवले गेले त्यावर आमचा आक्षेप आहे. हे प्रकरण पहिल्यांदा मुंबई पोलिसांकडे हस्तांतरीत व्हावे. मग बाकीच्या गोष्टी निश्चित व्हाव्यात.