Sushant Singh Rajput Case: साक्षीदारांना धमकावले जात आहे; भाजप आमदाराचा आरोप
Sushant Singh Rajput, Niraj Singh Babloo | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Case) प्रकरणातील साक्षीदारांना धमकावले जात आहे. गोष्टी ज्या पद्धतीने पुढे येत आहेत त्या पाहता त्यांची हत्याही होऊ शकते, असा आरोप सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचे नातेवाईक आणि भाजप ( BJP) आमदार नीरज सिंह बबलू (Niraj Singh Babloo) यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी या साक्षीदारांना संरक्षण द्यावे, अशी मागणीही नीरज सिंह बबलू यांनी केली आहे.

नीरज सिंह बबलू यांनी मुंबई पोलिसांवर या आधीही काही गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूत याच्या डायरीची काही पाने सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तर डायरीतील काही पाने फाडण्यात आल्याचेही वृत्त आले होते. हाच मुद्दा पकडत भाजप आमदार नीरज सिंह बबलू यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केला होता की, सुशांत हा नेहमी डायरी लिहीत असे. मात्र, त्याच्या मृत्यू नंतर मुंबई पोलिस त्याची डायरी घेऊन गेले. (हेही वाचा, Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या शवविच्छेदन रिपोर्टवर वकील विकास सिंह यांनी मृत्यूची वेळ न दिल्याने उपस्थितीत केला प्रश्न)

दरम्यान, नीरज सिंह बबलू आणि त्यांची पत्नी नुतन सिंह यांनी पाटना येथे लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत सुशांत सिंह राजपूत याला न्याय देण्याबाबत चर्चा झाली. 14 जन 2020 या दिवशी सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह बांद्रा येथील राहत्या घरात आढळून आला. त्याच्या शवविच्छेदन अहवालात त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.