प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Facebook)

गुजरात मधील सुरत येथील एका फार्म हाउसवर पोलिसांकडून धाड टाकण्यात आली. दारुच्या नशेत असेल्या 17 महिलांसह 50 जणांना अटक करण्यात आली आहे. सुरत मधील डुमास रोड येथील एका फार्महाउसवर दारु पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी या लीप इयरच्या पार्टीवर धाड टाकत पार्टीतील लोकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्वजणांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या दरम्यान पार्टीतील सर्वांनी अल्कोहोलचे सेवन केल्याचे चाचणीतून समोर आले. गुजरातमध्ये दारु बंदी कायदा आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांच्या विरोधात कठोर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी छापेमारी केलेल्या फार्महाउसमधून 7 हजारापेक्षा अधिक विदेशी दारु आणि 13 चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. याबाबतची माहिती ताब्यात घेण्यात आलेल्यांच्या परिवाराला दिली असता त्यांनी पोलीस स्थानकात तातडीने धाव घेतली. त्यांना हा प्रकार कळल्यावर परिवारातील सदस्यांना रडू कोसळले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 29 फेब्रुवारीला लीप इयर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही महिलांना सुद्धा बोलावण्यात आले होते.(आता दुकानातील प्रत्येक मिठाईवर मॅन्युफॅक्चरिंग, एक्स्पायरी डेट व इतर माहिती लिहिणे बंधनकारक- FSSAI चा आदेश)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुण-तरुणी हे उच्चभ्रु कुटुंबातील आहेत. लीप इयरच्या पार्टीवेळी हे सर्वजण दारुच्या नशेत होते. पोलिसांकडून ब्रीथ अॅनालाईझरच्या माध्यमातून त्यांची तपासणी केली.पोलिसांनी फार्महाउसवरुन तीन पेट्या बीअर आणि वोडकाच्या बॉटल्स जप्त केल्या आहेत. तसेच लाईव्ह फूड काउंटर्सवर सुद्धा दारु लावण्यात आली होती. तरुणींना नोटिस देत त्यांना सोडण्यात आले आहे.