Amphan Cyclone Update: अम्फान चक्रिवादळाचा वेग वाढला; ओडिशामध्ये वेगवान वारे, किनारपट्टीवरील तीन लाख नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हालवलं
Amphan Cyclone | (PC - Twitter/ANI)

यंदाचे 2020 हे वर्ष भारतासाठी मोठे आव्हान घेऊन आले आहे. देशात एका बाजालू कोरोना व्हायरस संकट आपले आव्हान कायम ठेऊन आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अवघा देश लढतो आहे. असे असताना आम्फन चक्रीवादळ (Cyclone Amphan) रुपात आणखी एक मोठे संकट देशासमोर उभे ठाकले आहे. बंगालच्या उपसागरात आम्फन महाचक्रीवादळ निर्माण झाले असून आता त्याचा वेगही वाढला आहे. या चक्रिवादळाचा सर्वाधिक फटका हा ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ओडिशा राज्यातील भद्रक परिरात वेगवान वारे वाहू लागले असून ही वादळापुर्वीची स्थिती मानली जाते. इथे आता पाऊसही सुरु झाला आहे. ओडीशा आणि पश्चिम बंगालसोबतच या वादळाचा फटका आंध्रप्रदेश राज्यातील काही भागांनाही बसू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

एएनआय ट्विट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार आणि प्रशासनाने आम्फन चक्रिवादळाचा संभाव्य धोका विचारात घेऊन सुमारे 3 लाख नागरिकांना किनारपट्टीच्या भागातून सुरक्षीत ठिकाणी हालवले आहे. दरम्यान, ओडिशामध्येही लाखो लोकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. शिवाय पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन्ही राज्यांमध्ये एनडीआरएफच्या 41 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा, Amphan Cyclone Update: बंगाल, ओडीसा राज्यांच्या समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा)

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट

सध्यास्थितीत आम्फन वादळ ताशी 200 किलोमीटर वेगाने वाहात आहे. आज (बुधवार, 20 मे 2020) दुपारनंतर हे वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यात हवामान विभागाने व्यक्त केली आहे.