Amphan Cyclone Update: बंगाल, ओडीसा राज्यांच्या समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Cyclone (Photo Credits: Wikimedia Commons)

पश्चिम बंगाल (West Bengal) आणि उत्तर ओडिशा (Odisha) किनारपट्टीवर घोंगावत असलेले अम्फन चक्रिवादळ (Cyclone Amphan) संकट विचारात घेऊन हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) म्हणतो की, दक्षिण किनारपट्टीतील मध्य समुद्र आणि बंगालची मध्य खाडीला लागून असलेल्या परिसरात चक्रिवादळाचा संभव आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क रहावे. आयएमडीने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सुपरसोनिक चक्रिवादळ अम्फन पश्चिम केंद्र आणि त्याच्या आजूबाजूच्या पूर्व बंगाल खाडीमध्ये निर्मण झाले आहे. हे वादळ प्रती तास 14 किलोमीटर वेगाने उत्तर-उत्तर-पूर्वेच्या दिशेने वाढते आहे.

आयएमडीने म्हटले आहे की, पुढील सहा तासांमध्ये हे चक्रिवादळ काही प्रमाणात वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे उत्तर-पश्चिम बंगाल खाडी ओलांडून हे वादळ हटिया बेटे (बंग्लादेश) सुंदरबन जवळ 20 मे 2020 च्या दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. याकाळात या वादळाचा वेग प्रति तास 155 ते 165 किलोमीटरवरुन तो प्रति तास 180 इतका होऊ शकतो.

अम्फान वादळावर सध्या विशाखापट्टनम (आंध्र प्रदेश) येथील डॉपलर वेदर रडार (डीडब्ल्यूआर) द्वारा सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्र यांनी माहिती देताना सांगितले की, अम्फन वादळ दक्षिण आणि उत्तर आणि पश्चिम बंगालच्या पूर्वेला असलेल्या मेदिनीपुर जिल्ह्यांमध्ये अधिक धोकादयक ठरु शकते. ज्यामुळे रेल्वे वाहतूक, विमानसेवा आणि रस्तेवाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, अम्फन वादाळाचा धोका विचारात घेऊन राष्ट्रीय अपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) 19 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर 4 तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ओडिशा राज्यात 13 तुकड्या तैनात आहेत. 17 राखीव आहेत. एनडीआरएफच्या काही तुकड्या संभाव्य संकटाच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गस्त आहेत.