सुनील ग्रोवर (Photo Credits: Yogen Shah)

Sunil Grover Heart Surgery: कॉमेडियन सुनील ग्रोवर याच्यावर हृदयाची शस्रक्रिया पार पडली आहे. त्याच्यावर मुंबईतील एशियन हार्ट इंस्टिट्युट मध्ये त्याचे ऑपरेशन करण्यात आले. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. गेल्याच आठवड्यात त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये तो भटुरे तळत असल्याचे दिसून आले होते. यावरुन त्याच्या चाहत्यांनी त्याने अभिनय सोडला का असे प्रश्न सुद्धा विचारले होते.

नुकत्याच कपिल शर्मा याच्या बायोपिकची घोषणा केली गेली तेव्हा सुनील ग्रोवर याचे नाव सुद्धा चर्चेत आले होते. कारण कपिलच्या आयुष्यात सुनिलची खुप मोठी भुमिका आहे. गुत्थी ते डॉक्टर गुलाटी पर्यंतची सुनिलची भुमिका सर्वांच्या पसंदीस पडली.(Sanjay Dutt And Sunil Shetty New Film: संजय दत्त आणि सुनील शेट्टी 12 वर्षांनंतर दिसणार एकत्र काम करताना, लवकरच नवीन चित्रपटाची घोषणा)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, सध्या सर्वांकडून त्याची प्रकृती लवकरात लवकर सुधरावी अशी प्रार्थना करत आहेत. तर सिमी ग्रेवाल हिने सुद्धा त्याच्या प्रकृतीसंदर्भात ट्विट केले आहे.